दत्त जयंती निमित्त रक्तदान शिबीर संपन्न !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
श्रीपंत भक्त मंडळ, मुंबई, दत्त जयंती उत्सव मंडळ, करिरोड, वंदे मातरम क्रीडा मंडळ, व शिवकृपा रहिवाशी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने व सदाशिव भोसले यांचे मार्गदर्शननाने व श्री दत्त जयंती उत्सवा निमित्त, श्री हनुमान मंदिर, शिवकृपा इमारत, स्व. स बा पवार मार्ग, करिरोड मुंबई येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.के. इ. एम. हॉस्पिटल परेल यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. शिबिरात ८९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी अवधूत निकम, संजय हातकर, विश्वनाथ डाकवे, भीमराव तिप्पे, मारुती नाईक व श्रीपंत भक्त बंधू, शिवकृपा रहिवासी संघ यांचे मोलाचे सहकार्य होते.

No comments:
Post a Comment