Wednesday, 15 December 2021

आदिवासीं वंचित घटकांच्या न्याय हककासाठी ठाणे जिल्हाधिकारी श्री.राजेश नार्वेकर यांना निवेदन !! 'प्रेरणा फाऊंडेशन' मार्फत 'दीप्ती ऊर्फ प्रेरणा गावकर' यांचा पुढाकार "मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा"

आदिवासीं वंचित घटकांच्या न्याय हककासाठी ठाणे "जिल्हाधिकारी श्री.राजेश नार्वेकर" यांना निवेदन !!

'प्रेरणा फाऊंडेशन' मार्फत 'दीप्ती ऊर्फ प्रेरणा गावकर' यांचा पुढाकार

"मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा"


मुंबई, (शांताराम गुडेकर) :
         आदिवासीं  वंचित घटकांच्या न्याय हककासाठी ठाणे जिल्हाधिकारी श्री राजेश नार्वेकर यांना निवेदन सादर केले. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचे आवाहन दिले आहे.आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्यापासून रस्त्या पासून आजपर्यंत वंचित राहावे लागले आहेत या साठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 


स्वातंत्र्यानंतरही मुरबाड तालुक्यातील  वाघदगड, साखरे, सराईवाडी, माळशेज घाट पायथ्याशी असलेल्या आंबे माळी, वाघ दगड, कदम पाडा, खापरी, डोईचा पुल या लोकांना रस्ता पाण्यापासून वंचित शासनाने वंचित ठेवले रस्त्यांची सोय नसल्यामुळे आजारी लोक. गरोदर महिला यांना प्रसंगी जीवही गमवावा लागला आहे.. आंबेमाली वाघदगड येथील लोकांस तर ३ किलोमिटर वर चालू जावे लागल्यामुळे येथील मुलेही शिक्षणापासून वंचीत राहिली आहेत 'प्रेरणा फाऊंडेशन' मार्फत 'दीप्ती ऊर्फ प्रेरणा गावकर' याच्या प्रयत्नामुळे आंबेमाळी गावला लाईटची सोय झाली असून थोड्याच दिवसात रस्ता व पाण्याचे पश्र सोडवण्याचा प्रयत्न केला नाही तर कल्याण नगर महामार्ग रोखणार याबाबत "जिल्हाधिकारी रा़जेश नावेॅकर" यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी 'प्रेरणा फाऊंडेशनच्या संस्थापिका / अध्यक्ष दिप्ती ऊर्फ प्रेरणा गावकर', 'सचिव वैभव कुलकर्णी' ,'पत्रकार राजेश भांगे', 'क्रांती सेना अध्यक्ष दिनेश जाधव', 'योगिता शिकेॅ, बाळू दळवी, अशोक सराई' इत्यादी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांना प्रेरणा फाऊंडेशन व आदिवासीं क्रांती संघटनेने असे आव्हान केले की आठ दिवसांत शासनाने जर काहीच पाऊल निर्णय घेतला नाही तर आंदोलन करणार असून याला जबाबदार शासन असेल असे  निवेदनही देण्यात आलेय आले आहे. हेच निवेदन जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील यांना पण देण्यात आले असून त्यांनी या वाड्याऺना आम्ही न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले आहे. प्रेरणा फाऊंडेशन व आदिवाशी क्रांति संघटनेनं पुकरलेली ही चळवत शासनाला कितपत जागृत करते याचे उत्तर पुढील ८ दिवसांत दिसेल अशी अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र दिनानिमित्त साकेत मैदानावर नागरी संरक्षण दलाचे दिमाखदार संचलन !!

महाराष्ट्र दिनानिमित्त साकेत मैदानावर नागरी संरक्षण दलाचे दिमाखदार संचलन !!  ***    १०५ हुतात्म्यांना मानवंदना; स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध का...