Wednesday, 15 December 2021

कलाश्रमाच्या वतीने 'सरले वर्ष, कोणी वेधले लक्ष' स्पर्धा !! "वादक कलाकार चंद्रकांत चव्हाण यांच्या स्मरणार्थ 'सरले वर्ष, कोणी वेधले लक्ष 'स्पर्धा"

कलाश्रमाच्या वतीने 'सरले वर्ष, कोणी वेधले लक्ष' स्पर्धा !!

"वादक कलाकार चंद्रकांत चव्हाण यांच्या स्मरणार्थ 'सरले वर्ष, कोणी वेधले लक्ष 'स्पर्धा"


मुंबई, (शांताराम गुडेकर) :

            'कलाश्रम' ही शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्य करणारी संस्था आहे. जी स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील यांच्या कला केंद्राच्या अंतर्गत कार्य करते. 'सरले वर्ष, कोणी वेधले लक्ष' हि कलाश्रमची ३८ वी स्पर्धा असून. सामाजिक कार्यकर्ते, वादक कलाकार चंद्रकांत चव्हाण यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने घेण्यात आली आहे. याच स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. २०२१ या वर्षात नीरज चोपडा, कंगना राणावत, आर्यन खान यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा झाली. ती योग्य की अयोग्य या विषयाची प्रतिक्रिया स्पर्धेकांने दोन मिनिटाचा व्हिडिओ करून सोबतच्या ९८६९००८८०५ वॉस अप नंबरवर पाठवायचा आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ विजेत्याला रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल. या स्पर्धेला संजीव चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले आहे. स्पर्धा समन्वयक म्हणून मृण्मयी मोडक काम पाहाणार आहेत. कलाश्रमचा 'अभियान सन्मान' हा कार्यक्रम प्रत्येक महिन्याला मुंबईत होत असतो. ३० डिसेंबर या दिवशी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे होणारा हा ४१ वा मासिक उपक्रम असणार आहे. अधिक माहितीसाठी संचालिका नंदिनी नंदकुमार पाटील यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !!

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !! कल्याण (टिटवाळा), संदीप शेंडगे : मांडा–टिटवाळा (पूर्व) येथील विद्यामंदिर शाळा...