इमारतीच्या गच्चीवरील शेतीवरील शेती तरे कुटुंबियांचे होत आहे कौतूक !!
कल्याण, (ऋषिकेश चौधरी) : शहरातील सिमेंट कॉन्क्रीटीकरणाच्या जंगलात झाडा झुडपांचा जीव गुदमरतो. गगनचुंबी इमारतीने शहराच्या जागा व्यापल्या जात आहे. मात्र दुसरीकडे इमारतीवरील गच्चीवर शेती फुलविण्याचे काम कल्याणच्या तरे कुटुंबांने केले आहे. त्यांनी फुलविलेली गच्चीवरील शेती हा कौतूकासह चर्चेचा विषय बनला आहे.
जगदीश तरे आणि त्यांच्या पत्नी संध्या हे कल्याण पूर्व भागातील खडेगोळवली परिसरात राहता. या ठिकाणी दाट लोकवस्ती आहे. या दाट लोकवस्तीच्या ठिकाणी त्यांची श्री समर्थ ही तीन मजली इमारत आहे. या इमारतीची गच्ची मोकळीच होती. गच्चीची जागा जवळपास 21 चौरस फूट होती. बहुतांश सोसायटय़ा या गच्चीवर अडकळीचे सामान टाकून ठेवतात. तर गच्चीचा वापर इमारतीमधील सांस्कृतिक गेट टूगेदर कार्यक्रमासाठी करतात. तरे यांनी या जागेचा वापर अन्य इमारतीतील रहिवासी करतात त्या सारखा न करता वेगळा मार्ग चोखाळला आहे. त्यांना शेतीची आवाड आहे. मात्र शहरात शेती शक्य नाही. त्यासाठी त्यांनी गच्चीवर शेती करण्याचे ठरविले. त्यांनी हळूहळू लहान मोठय़ा कुंडय़ा आणल्या. त्यांच्या पत्नी संध्या यांनाही पाना फुलांसह शेतीची आवड आहे. दोघांच्या मनातील विचार त्यांनी खरा करुन दाखविला. गच्चीवर त्यांनी फुल झाडांपासून सुरुवात केली. त्यात मग फळ झाडे आणि भाज्याही लावल्या. त्यांची गच्चीवरील शेती बहरली आहे. फुलांमध्ये जास्वंदी, गुलाब, मोगरा फुलला आहे. त्याचबरोबर आनंदाच्या फुलांचे झाडही नित्यनियमाने बहरत आहे. याशिवाय त्यांनी हळद लावली होती. साडे तीन किलो हळद तयार झाली. वांगी लावली. केळी, चिकू, लिंबू, टोमॅटो, घेवडा, तुरीच्या शेंगा आदीची लागवड केली आहे. आंब्याला मोहर आला आहे. गच्चीवरील शेतीत पिकविलेला ताजा भाजीपाला आणि फळे त्यांना खायला मिळतात. कोरोना काळात त्यांना या शेतीचा फार उपयोग झाला.
--------------------
No comments:
Post a Comment