Tuesday, 28 December 2021

*अंबरनाथमध्ये ग्रंथोत्सव* "या सुवर्ण संधीचा रसिकांनी घ्यावा" - आयोजक

*अंबरनाथमध्ये ग्रंथोत्सव* "या सुवर्ण संधीचा रसिकांनी घ्यावा" - आयोजक


अंबरनाथ, ऋषिकेश चौधरी : अंबरनाथ शहरात ग्रंथ प्रदर्शन आणि विक्री महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, शेतीजन्य आणि साहित्ययात्रा यांच्या संयुक्त विद्यमाने हे ग्रंथप्रदर्शन आणि विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दोन दिवसात हजारो रसिकांनी या महोत्सवाला भेट दिली आहे. पाचशेच्या वर पुस्तकांची विक्री झाली आहे. 


वाहनतळ. य. मा. चव्हाण नाट्यगृह, छत्रपती शिवाजी चौक, अंबरनाथ पूर्व येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शनिवार दिनांक २५ डिसेंबर ते रविवार दिनांक ९ जानेवारी या कालावधीत सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले असणार आहे. 


या प्रदर्शनात कथा, कादंबऱ्या, ललित, आत्मचरित्र, आरोग्य, विज्ञान, धार्मिक आदी विषयांवरील हजारो पुस्तके मांडण्यात आली आहेत. मौज, राजहंस, मेहता, रोहन, मनोरमा, मनोविकास, ज्योत्स्ना, डिंपल, परममित्र, मॅजेस्टिक आदी 40 हून अधिक नामांकीत प्रकाशकांची पन्नास हजाराहून अधिक पुस्तके प्रदर्शनात पाहता आणि खरेदी करता येणार आहेत. ही पुस्तके किमान दहा टक्के सवलतीमध्ये खरेदी करता येतील. मराठी बरोबरच इंग्रजी भाषेतील पुस्तकांचाही प्रदर्शनात स्वतंत्र विभाग असणार आहे. वाचक, शाळा, महाविद्यालये, गृहसंकुलांना पुस्तक खरेदीची ही विशेष संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे. 

या पुस्तक प्रदर्शनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शन आवारात  रविवार दिनांक २ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता सुप्रसिद्ध कवी अशोक नायगांवकर यांच्या काव्य वाचनाची मैफल अंबरनाथकरांना अनुभवता येणार आहे. प्रदर्शन काळात स्थानिक आणि जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवलेले अनेक नामवंत लेखक भेट देणार आहेत. प्रदर्शन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात रसिकांना विनामूल्य प्रवेश असणार आहे. 

या सुवर्ण संधीचा रसिकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. 

---------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

पर्यटकांनी 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' द्वारे ऐतिहासिक पर्यटनाचा लाभ घ्यावा - विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पर्यटकांनी 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' द्वारे ऐतिहासिक पर्यटनाचा लाभ घ्यावा - विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार ...