Tuesday, 28 December 2021

मुरबाड पंचायत समिती अभियंत्याचा प्रताप !! **नळपाणी पुरवठा कामाचे बिल काढण्यासाठी मागितले 2 लाख 80 हजाराची लाच **. **अँडीओ क्लिपने केला भ्रष्टाचार उघड **

मुरबाड पंचायत समिती अभियंत्याचा प्रताप !! **नळपाणी पुरवठा कामाचे बिल काढण्यासाठी मागितले 2 लाख 80 हजाराची लाच **.             

**अँडीओ क्लिपने केला भ्रष्टाचार उघड **


मुरबाड, (प्रतिनिधी) : मुरबाड तालुक्यातील कल्याण -नगर महामार्गावर असलेल्या शिवळे गावातील नळपाणी पुरवठा योजनेचे बिल काढण्यासाठी पाणी पुरवठा उप अभियंत्यांनी पैसे मागितल्याची तक्रार पाणिपुरवठा समितीने ठाणे जिल्हापरीषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे केल्याने एकच खळबळ माजली आहे. 

या बाबत मिळालेली माहीती अशी की मुरबाड तालुक्यातील शिवळे ग्रामपंचायतीला गावातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी माजी आमदार गोटीराम पवार यांनी 2007 मध्ये या योजने साठी 67 लाख रूपये मंजूर केले होते. हे काम 2007 साली पाणीपुरवठा समितीने सुरू केले होते. मात्र हे काम संथगतीने सुरू असल्याने सदर काम पुर्ण होण्यास 2020 साल उजाडले. तसेच हे काम सुरू असताना या कामावर लक्ष ठेवण्यासाठी जूनिअर इंजिनियर सुरेश कादरी यांची नेमणूक करण्यात आली होती. समितीने अंदाज पत्रकानुसार काम सुरू ठेवले होते. या आगोदर झालेल्या कामाचे बिलाचे पैसे बँंकेतून काढण्यासाठी समितीने कादरी यांच्या कडे पत्राची मागणी गेली असता कादरी यांनी फोनवरून 2 लाख रुपये मला द्या व 80 हजार रूपये डेप्यूटी इंजिनीयर शेख यांना द्यावे लागतील. अशी मागणी समितीकडे केली. सदर काम प्रगतीपथावर असल्याने समितीने नाईलाजाने 2 लाख रूपये कादरी यांना दिले. या नंतर उर्वरीत काम समितीने 2020 साली पुर्ण केले. काम पुर्ण झाल्याने कादरी यांनी एम.बी. तयार करून या कामापोटी 4 लाख 19 हजार रूपये बँकेत शिल्लक असल्याचे समितीला सांगितले. या कामा साठी आणलेल्या साहित्याचे बिल देणे असल्याने समितीने बँकेतील 4 लाख 19 हजार रूपये काढण्यासाठी कादरी यांच्याकडे पत्राची मागणी केली असता कादरी यांनी 2 लाख 80 हजार रूपया पैकी राहिलेल्या 80 हजार रूपयाची मागणी समितीकडे केली. मात्र हे पैसे देण्यास समितीने नकार दिल्याने कादरी यांनी पत्र देण्यास टाळाटाळ केली. या दरम्यान ग्रामपंचायतीची निवडणूक जाहिर झाल्याने काही वेळ या बाबीकडे समितीने दर्लक्ष केले.पुन्हा  निवडणुकी नंतर या समितीवर नव्याने निवडून आलेल्या सरपंचांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. याचा फायदा घेत कादरी यांनी पुर्वीच्या समिती सदस्यांना अंधारात ठेवून नविन अध्यक्षांना बँकेत शिल्लक असलेल्या 4 लाख 19 हजार रूपया पैकी 2 लाख रूपये बँकेतून काढण्यासाठी पत्र दिले. ही बाब पुर्वीच्या समिती सदस्यांना समजताच त्यानी या नविन अध्यक्षांचा या कामासी काहीही संबध नसताना तूम्ही त्यांना पैसे काढण्यासाठी पत्र कसे दिले असा जाब विचारला असता, गोंधळलेल्या कादरी यांनी या समितीलाही 4 लाख रूपये काढण्याचे पत्र दिले. या कामाचे 4 लाख 19 हजार रूपयेच शिल्लक असताना कादरी यांनी नव्या अध्यक्षांना 2 लाख व जून्या अध्यक्षांना 4 लाख असे 6 लाख रूपये काढण्यासाठी पत्र कसे दिले याचाही जाब या तक्रारीत विचारला आहे. या तक्रारीत झालेल्या संभाषणाची आडीओ क्लिप दिली आहे. 

नव्या अध्यक्षांनी पैसे काढण्यासाठी दिलेल्या  पत्राचा ऊपयोग करून बँक खात्यातून 1 लाख 50 हजार रूपये काढल्याचे निदर्शनास येताच समितीने मुख्य कार्यकारी  अधिकारी यांच्या कडे लेखी तक्रार करून दिशाभुल करणारे अधिकारी कादरी यांना निलंबीत करण्याची मागणी केली आहे. 

पाणी पुरवठा अभियंता यांनी दिलेल्या पत्रावरून नळपाणी पुरवठ्याच्या ऊर्वरीत कामासाठी दिड लाख रुपये काढण्यात आले असून हे पैसे या कामी खर्च केले आहेत,---  समिती अध्यक्ष, निलीमा जाधव, सरपंच ग्रामपंचायत शिवळे. 

समितीने दिलेल्या तक्रारीवरून योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, ---- राधेशाम आडे, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा, जि.प. ठाणे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...