समाजसेवक चंद्रकांत करंबेळे यांना दिव्यंग शक्ती व दिव्यांग सेवा गौरव पुरस्कार देऊन केले सन्मानित !!
कोकण, (दिपक मांडवकर/शांताराम गुडेकर) :
महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी व दिव्यांग समन्वय समिती जिल्हा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अपंग दिन सोहळा दोन दिवस श्यामराव पेजे सभागृह, जिल्हा परिषद रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचारी सर्वसामान्य दिव्यांग तसेच दिव्यांगांच्या सेवेसाठी कार्यरत व्यक्ती व संस्थांना दिव्यंग शक्ती व दिव्यांग सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष साईनाथ पवार उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत साहेब.
सकाळच्या सत्रात कार्यशाळेचे उद्घाटन राजापूर लांजा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राजन साळवी राज्य अध्यक्ष साईनाथ पवार उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हाध्यक्ष विलास गोरे यांनी दिव्यांगांच्या प्रलंबित समस्यांचा लेखाजोखा मांडला. यावर बोलताना आमदार राजन साळवी यांनी नव्याने बांधण्यात येत असलेल्या लांजा व राजापूर पंचायत समितीची समितीच्या नूतन वास्तू मध्ये स्वतंत्र दिव्यांग पक्ष उभारणार असल्याचे सांगितले. राज्याध्यक्ष साईनाथ पवार यांनी दिव्यांग कर्मचारी सर्वसामान्य दिव्यांगांना सोबत घेऊन त्यांच्या त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करताहेत याचं कौतुक करीत दिव्यांग कायदा २०१६ बद्दल मार्गदर्शन केले जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संघामित्रा फुले यांनी यांनी उपस्थित दिव्यांगांना ऑनलाईन प्रमाणपत्र बाबत मार्गदर्शन करीत बोगस दिव्यांगांना ऑनलाइन प्रक्रिया मधून बाहेर काढताना खरया दिव्यंगावर अन्याय होणार नाही असे अभिवचन दिले. नामदार उदय सामंत, आमदार राजन साळवी, नगराध्यक्ष बंड्या शेठ साळवी, जिल्हाध्यक्ष विलास चाळके तसेच गवाणे गावचे सुपुत्र कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा - लांजा सहसचिव आणि मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत असणारे समाजसेवक श्री. चंद्रकांत शिवराम करंबेळे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच श्री.चंद्रकांत करंबळे यांनादेखील पुरस्कार देण्यात आला व समाज सेवक श्री चंद्रकांत शिवराम करंबळे यांच्याकडून कै. आई, वडिल चंद्रभागा शिवराम करंबळे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना रत्नागिरी व दिव्यांग समन्वय समिती रत्नागिरी संस्थेचे अध्यक्ष श्री. विलास गोरे सर व सचिव आनंद त्रिपाठी सर यांच्याकडे त्यांच्या संस्थेच्या कार्यालयासाठी संगणक प्रिंटर मशीन भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अमिता आदवडे व सुभाष चोपडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष विलास गोरे, सचिव आनंद त्रिपाठी, उपाध्यक्ष अनंत गवाले, कार्याध्यक्ष अशोक जायभाय, समन्वय समितीचे उपाध्यक्ष अशोक भुस्कुटे, गौतम सावंत, विजय कदम, रत्नागिरीचे प्रदीप मोरे महिला गाडी रेणुका उपाध्याय, सौरवी जाधव, बाबू सावंत आदींनी मेहनत घेतली. यावेळी दिलीप टक्के, मनोज मोहिते गोविंद तारवे रवींद्र घाणेकर, संदीप राजेशिर्के, दीपक कांबळे अशोक सोळंके, उदय रावण, अरविंद मोरे, संतोष सावंत, विजय मोहिते, रवींद्र निवळे सरिता पाटील, राकेश कांबळे चंद्रशेखर पेटकर, संजय कळमुनकर, रवींद्र मोहिते तसेच लांजा पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री सुभाष रामाणे, गवाणे गावातील प्रमुख गावकार श्री गणपत करंबेळे, श्री गणपत रामाणे,श्री अमोल मेस्त्री सर, श्री.वैभव चौगुले सर, श्री. सुरज मालपेकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.संपूर्ण जिल्ह्यामध्ये एसटीचा संप असून सुद्धा सर्वसामान्य दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते .



No comments:
Post a Comment