समाज सेवक चंद्रकांत करंबेळे व अन्य मान्यवरांनी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा जावडे ता. लांजा जि. रत्नागिरी येथे गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !!
कोकण, (दिपक मांडवकर/शांताराम गुडेकर) :
तालुका -लांजा गवाणे गावचे सुपुत्र तथा कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा-लांजाचे सह-सचिव व उच्च न्यायालयातील कर्मचारी समाज सेवक श्री. चंद्रकांत शिवराम करंबळे, ऍड. श्री. मनोहर मांडवकर साहेब -उच्च न्यायालय मुंबई तसेच श्री. प्रविण अ . घाडगे -भाजप सरचिटणीस ( वांद्रे ) विधानसभा मुंबई यांच्याकडून हेरिटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन सोसायटी लांजा- संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा जावडे ता. लांजा जि.रत्नागिरी येथे गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे मान्यवर श्री. सुभाष धनाजी रामाणे (गवाणे) माजी उपसभापती पंचायत समिती लांजा. श्री. गणपत लक्ष्मण करंबेळे-माजी सरपंच गवाणे गावचे गाव प्रमुख, श्री अमोल मेस्त्री- सहाय्यक शिक्षक न्यू इंग्लिश स्कूल लांजा, श्री. सुरेश खामकर गवाणे गावचे सदस्य व शाळेतील शिक्षक कर्मचारी न्यू इंग्लिश स्कूल जावडे संदेश कांबळे (मुख्याध्यापक ) क्रांती करंबळे (सहायक शिक्षिका) वैदेही मेस्त्री (सहायक शिक्षिका) विध्देश फणसे (सहा. शिक्षक) कुणाल कदम (सहा. शिक्षक) माध्यमिक आश्रम शाळा, जावडे. गजानन पांचाळ (मुख्याध्यापक) आनंदा शिंत्रे (सहा शिक्षक), विधी गुरव (सहा शिक्षिका), प्राथमिक प्राथमिक आश्रम शाळा जावडे. शिवप्रसाद ताटके (मुख्याध्यापक) गावातील ग्रामस्थ रघुनाथ नामये (सामाजिक कार्यकर्ते) व अन्य ग्रामस्थांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:
Post a Comment