Wednesday, 8 December 2021

कोकण कट्टा विलेपार्ले मुंबईतर्फे शनिवारी २२ व्या वर्धापन दिनानिमित्त "कोकण सन्मान" पुरस्कार-२०२१ या सोहळ्याचे आयोजन !! "सौ. स्नेहा पाटील-मोरे, शैलेश जाधव, प्रमोद तरळ, हेमंत सावंत, समीर खाडिलकर यांच्यासह अनेकांचा होणार गौरव"

कोकण कट्टा विलेपार्ले मुंबईतर्फे शनिवारी २२ व्या वर्धापन दिनानिमित्त "कोकण सन्मान" पुरस्कार-२०२१ या सोहळ्याचे आयोजन !!

"सौ. स्नेहा पाटील-मोरे, शैलेश जाधव, प्रमोद तरळ, हेमंत सावंत, समीर खाडिलकर यांच्यासह अनेकांचा होणार गौरव"


मुंबई, (शांताराम गुडेकर) :

              कोकण कट्टा ही विलेपार्ले, मुंबई येथील संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवणारी, सेवार्थ उपक्रमाचा वसा घेतलेली एक सामाजिक संस्था आणि हा वसा कार्यान्वित करण्यासाठी अतोनात मेहनतीचे व्रत घेतलेले त्याचेच संस्थापक श्री. अजितदादा पितळे आणि त्यांचे सर्व सहकारी कायम मेहनत घेतात. अनेक नैसर्गिक आपत्ती, पावसाळी पूर, दुष्काळ अशा नानाविध आपतींना तोंड देण्यासाठी गेली २२ वर्ष सातत्याने मदत पोहचवण्याचे काम अनेक जिल्ह्यात, गावांमध्ये कोकण कट्टा करत आहे. ग्रामीण भागातील लोकांना जलसंचयाबाबत मार्गदर्शन, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भासत असलेल्या उणिवा दूर करण्यासाठी अनेक शिबिरे, गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप, रोजगार मेळावे, जलसाक्षरता अभियान, अनेक अनाथालयांना भिक्षाफेरीद्वारे अन्नधान्य व कपडे वाटप, वृक्षारोपण, आदिवासी भगिनींना भाऊबीज भेट म्हणून साडी आणि फराळ देणे आणि अनेक प्रकारची मदत कार्य पोहचवणारी संस्था म्हणून "कोकण कट्टा"सर्वांनाच परिचित आहे.
               हा सेवायज्ञ यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक श्री. अजितदादा पितळे हे त्यांच्या शिलेदारांना म्हणजेच संस्थेच्या कार्यकर्त्यांना नेहमीच मोलाचे मार्गदर्शन करत असतात. त्यांचे कार्यकर्तेही निस्वार्थ भावनेने स्वतःला झोकून कामे करतात. तेही कोणत्याही शाबासकीची वा पुरस्काराची अपेक्षा न करतात .एवढ्या सच्च्या दिलाचे, स्वच्छ नीतीचे कार्यकर्ते लाभणे आणि वर्षानुवर्षे त्यांचे ऋणानुबंध टिकून राहणे हे अहोभाग्यच म्हणावे लागेल.अध्यक्ष : श्री. नितीनजी कुलकर्णी, सचिव श्री. योगेशजी साटम, कोषाध्यक्ष श्री.सुजितजी कदम, यांच्यासहित प्रामुख्याने सक्रीय असलेले सर्वश्री दयानंदजी मांडवकर, जयवंतजी जोयशी, जगन्नाथजी गावडे, सुनीलजी वनकुंद्रे, संतोषजी कदम, हर्षलजी धराधर, प्रभाकरजी सांडम, मनिषजी माईन हे अष्टप्रधान मंडळ या कोकण कट्टाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. तसेच सक्रीय सदस्या, पुस्तकपेढी प्रमुख म्हणून सौ. प्राजक्ताताई भोईटे- सातारे यांच्या सहकार्याने रत्नागिरी, चाफे येथील मोहिनी मुरारी मयेकर महाविद्यालयाला UPSC व MPSC शी संबंधित जवळपास ३ लाखांची पुस्तके देणगी स्वरूपात देण्यात आली आहेत. दिनांक १२ डिसेंबर १९९९ रोजी स्थापन केलेली ही संस्था आज २२ व्या वर्षात पदार्पण करत आहे.
             अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करत असताना इतर अनेक संस्था आणि सामाजिक कार्य करणाऱ्या अनेक विभूती कोकण कट्टाच्या संपर्कात आल्या. कोकण कट्टाच्या वर्धापनदिनी त्या सर्वांचा "कोकण कट्टा सन्मान पुरस्कार -२०२१" देऊन सत्कार करण्याचा कोकण कट्टाचा संकल्प आहे. त्या सर्व मान्यवर सत्कारमूर्तीमध्ये गेली नऊ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. २०१२ मध्ये त्यांनी आपल्या पत्रकारितेतील वाटचालीला सुरुवात केली. त्यांनी पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळात फोटो जर्नलिस्ट आणि पत्रकार अशी दुहेरी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. छायाचित्र-पत्रकार म्हणून काम करताना केवळ फोटोच्या माध्यमातून बातमी उभे करण्याचे कसब त्यांनी मिळवले आहे. पत्रकारितेच्या विविध अंगांना स्पर्श करताना त्यांनी साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक आणि आरोग्य बीटमध्ये उत्कृष्ट काम केले आहे. त्यांची विशेषतः आरोग्य क्षेत्रातील कामगिरी उठावदार आहे. २०१९ मध्ये त्यांची जागतिक पातळीवरील इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ व्हायटल स्ट्रेटजी संस्थेद्वारे मुंबईतील एकमेव प्रादेशिक भाषेतील फेलो (शिष्यवृत्तीधारक) रिसर्चर म्हणून नियुक्ती झाली होती. अशा सौ. स्नेहा सचिन पाटील- मोरे (पत्रकार- लोकमत) २) गेली १५ वर्ष वृत्त छायाचित्रकार म्हणून काम करत असलेले  गेल्या १२ वर्षा पासून महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई आवृत्तीसाठी काम करत असलेले आपल्या छायाचित्रणाच्या माध्यमातून सामान्य जनतेचे प्रश्न, मुंबई शहरात होणारे बदल, रोजच्या घडामोडी असे विविध विषय प्रामाणिकपणे लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करणारे शैलेश जाधव (म. टा. छायाचित्रकार) ३) गेली 22 वर्षे पत्रकारिता, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कार्यरत विशेष कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र शासन कोकणातील अनेक प्रश्न शासन दरबारी सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळवून देणे, तसेच कोकणातील शाळांत विविध उपक्रम राबविणे, कोरोना काळात मास्क, Temp/Oxy meter चे वाटप, सुमारे ४५ हून अधिक राज्यस्तरीय व २) राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रमोद तरळ (मुक्त पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते) ४) हेमंत सावंत (समाजसेवक आणि अध्यक्ष,स्वामी सेवा फाउंडेशन), ५) बोरीवली येथील सामाजिक कार्यकर्ता, महाराष्ट्र हरित सेना वन विभाग- महाराष्ट्र शासन सदस्य, माझी वसुधरा मित्र (पर्यावरण व वातावरनिय बदल विभाग- महाराष्ट्र शासन), माहिती अधिकार/पोलीस मित्र /पत्रकार संरक्षण सेनाचे मुंबई जन संपर्क अधिकारी समीर खाडिलकर (सामाजिक कार्यकर्ते) ६) अंधेरी-साईवाडी येथील रहाणारे  कोकण कट्टा या संस्थेशी गेली ६ ते ७ वर्ष सल्गन असून अनेक उपक्रमात सहभागी राहण्याचा प्रयत्न करणारे अचानक मित्र मंडळाच्या वतीने कोकण कट्टा तर्फे विभागात कार्यरत. सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहण्याची आवड असून. विभागात मंडळाच्या वतीने जेष्ट नागरिकांसाठी सांज कठ्ठा, मोफत वृत्तपत्र वाचनालय चालवीले जाते. सोबत पारंपरिक संस्कृती जपण्याच्या उद्देशाने दहिहंडी व माघी गणेश जयंती गेली १० वर्ष साजरी करण्यात येते.असे सामाजिक कार्यकर्ते विजय बेटकर (अचानक मित्र मंडळ) ७) श्री हनुमान क्रीडा मंडळ (रजि) हि संस्था १५ वर्षा पासून कार्यरत असून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक असे विविध कार्यक्रम राबवत असते तसेच कोकणकट्टा संस्थेच्या माध्यमातून झाडे लावा झाडे जगवा, स्वच्छ्ता अभियान जलसंधारन राबिवले गेले तसेच MPSC, UPSC ची पुस्तके कोकणकट्टा संस्थेच्या माध्यमातून मोहिनी मुरारी मयेकर कॉलेज ला प्रधान करणारे विकास सांबरे (सामाजिक कार्य- हनुमान कला,क्रीडा मंडळ) ८) राष्ट्रीय मल्लखांब खेळाडू १५ वर्ष, मल्लखांब राष्ट्रीय पंच ५ वर्ष, २२ वर्ष प्रशिक्षक अनुभव,आत्ता पर्यंत ५० जिल्हा, २४ राज्य व १२ राष्ट्रीय खेळाडू घडविले,आंतरराष्ट्रीय मल्लखांब (पोर्तुगाल 2003, जपान 2008 ) प्रचार व प्रसार, संस्थापक - मल्लखांब कट्टा, प्रमुख प्रशिक्षक - श्री पार्लेश्वर व्यायामशाळा, विलेपार्लेचे गणेश देवरुखकर (प्रशिक्षक- मल्लखांब ) ९)लेखक दिग्दर्शक कलाकार निर्माता. छोटा व्यवसायिक, सप्तरंगी कोकण कलामंच मुंबई, कद्रेकर कलामंच, झुंजार प्रोडक्शन, या संघटनेचे होतकरू सदस्य, आम्ही कोकणकर या यूट्यूब चॅनलचे निर्माता. सामाजिक अनेक विषयाला वाचा फोडण्याचे कार्य आम्ही कोकणकर हे यूट्यूब चॅनल करत असते तसेच कोकणचे वैभवशाली निसर्ग सौंदर्य तसेच भाषा शैली, तेथील राहणीमान, रूढी, परंपरा, संस्कृती, असे अनेक पैलू जगासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही कोकणकर हे यूट्यूब चॅनल करतआहे. समाजात होत असलेल्या अन्यावावर आवाज उठवून त्यावर प्रहार करण्याचे कार्य, तसेच सामाजिक भान असलेला छोटा कार्यकर्ता कृष्णा येद्रे ( यु ट्यूब- आम्ही कोकणकर)  १०) निखिल सकपाळ ( यु ट्यूब - कोकणी निखिल) ११) अनिकेत रासम ( यु ट्यूब - गोष्ट कोकणातली वाहिनी) १२) प्रगत लोके ( यु ट्यूब - प्रगत लोके चॅनेल) १३)कोकण सुपुत्र महाड तालुका. सामाजिक क्षेत्रात २५ वर्ष कार्यरुग्ण सेवेसाठी अविरत सेवा. विलेपार्ले पश्चिम सेना शाखा प्रमुख संजय जाधव ( रुग्णसेवा), विवेक वैद्य, आत्माराम डिके यांचा समावेश आहे. या आनंदोत्सवात आपल्या सोबत सहभागी होण्यासाठी सन्माननीय डॉ. गजानन रत्नपारखी (हृदयरोग तज्ञ, अध्यक्ष : गुरुकृपा फाउंडेशन) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी आपण सर्वांनी शनिवार  दिनांक ११ डिसेंबर २०२१ रोजी, स्वातंत्र्यवीर सावरकर केंद्र, महात्मा गांधी रोड, विलेपार्ले (पूर्व) येथे सायंकाळी ५ ते ८ वाजता उपस्थित राहावे असे आवाहन कोकण कट्टा तर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...