बाजारपेठ पोलीस ठाणे व वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचा दैनिक बातमीदार तर्फे जाहीर सत्कार !!
कल्याण, बातमीदार - बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील व वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांचा दैनिक बातमीदार चे उपसंपादक प्रकाश संकपाळ व मुंबई विभागीय संपादक सचिन बुटाला यांनी जाहीर सत्कार केला.
नरेंद्र पाटील यांनी यापूर्वी खडकपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कामकाज केलेले आहे तसेच महेश तरडे यांनी सुद्धा कल्याण मध्ये काम केलेले आहे
दैनिक बातमीदार तर्फे दोघांचा सत्कार झाल्याने त्यांनी बातमीदार चे आभार व्यक्त केले आहेत व दैनिक बातमीदार आम्हाला भविष्यात अशीच साथ देईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
याप्रसंगी वाहतूक शाखेतील अनेक कर्मचारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment