Wednesday, 8 December 2021

कल्याण आरटीओ आवारातील एजंटने क्लार्क वर उचलला हात, कर्मचा-यांचे कामबंद अंदोलन, असे का घडले ?

कल्याण आरटीओ आवारातील एजंटने क्लार्क वर उचलला हात, कर्मचा-यांचे कामबंद अंदोलन, असे का घडले ?


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण उपप्रादेशिक कार्यालयातील एका क्लार्क जवळ बसलेल्या एजंटने अगदीच शुल्लक कारणावरून त्याला धक्काबुकी केली, याविरोधात कार्यायलातील इतर कर्मचाऱ्यांनी काम बंद अंदोलन सुरू केले आहे, परंतु असे का घडले ?इनमीनतीन असणारे एंजट आज शंभरच्या वर झाले, याला कोण जबाबदार ? त्यांच्या कडून मिळणाऱ्या 'मलिद्याचे' काय ?असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.


शासनाला अगदी नगद महसूल मिळवून देणारा विभाग म्हणून आरटीओ कडे म्हणजेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाहिले जाते. गाड्यांच्या पासिंग पासून त ऐ टू झेड कामे सध्या तरी एजंटाच्याच माध्यमातून होत आहेत, याचे कारण काय ? कार्यालयातील वरीष्ठ अधिका-यापासून ते कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यत अशी सिस्टीम निर्माण करून ठेवली आहे की त्या नागरिकांने एजंटकडे जाण्याशिवाय पर्याय ठेवलेला नाही, सर्व सामान्य नागरिक यांच्याकडे काम घेऊन गेले तर नियमांची जंत्रीच ऐकवली जाते, मात्र एंजटाना या महाशयांची २४ तास सेवा उपलब्ध असते, यांचे ताजे उदाहरण म्हणजे मागील आठवड्यात एक जागृत नागरिक त्याचे आरसीबुक संदर्भातील एक काम घेऊन (एंजटाशिवाय) स्वतः आरटीओ तानाजी चव्हाण यांच्या कडे गेले, त्यांनी ताबडतोब या अर्जावर सही केली, मात्र पुढील कारवाई साठी खिडकी नंबर ५, ७, ८ येथे जायला सांगितले, यावर खिडकी क्रमांक ५ वर एक महिला कर्मचारी होत्या, त्यांनी हा अर्ज बघितला देखील नाही, उलट आपण येथे बसून मेहरबानी केल्याचे संबंधित नागरिकांला ऐकवले, तर ७/८ खिडकीवर तर अजून वेगळाच अनुभव आला, ७ नं वरील खिडकीतील महाशय नियम दाखवत मागे जाऊन बसले व एजंटाच्या कामाला सुरुवात केली, तर ८ नंबरवरील शिंदे नामक क्लार्क जेवणाच्या निमित्ताने कुठे गेले ते देवालाच ठाऊक ?संबंधित जागृत नागरिक सुमारे दीड तास त्या रिकाम्या खुर्ची जवळ थांबून वाट पाहत बसला पण महाशय काय आले नाही, अखेरीस डेप्युटी आरटीओ विनोद साळवी यांच्याकडे या बाबतीत विचारना केली, तेव्हा आपले कर्मचारी काम करतात, अशी 'री 'त्यांनी ओढली, यावर संबंधित नागरिकांने रिकाम्या खुर्चीचे फोटो दाखवले, तेव्हा मात्र तूमचे काम करून घ्या कशाला विषय वाढवता असा फुकटचा सल्ला दिला. त्यामुळे अशी परिस्थिती असेल तर नागरिक एंजटाकडे नाही जाणार तर काय करणार ?


कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात काम करणारे क्लार्क मनिष जाधव यांच्या बाजूला एजंट मच्छिंद्र केणे हा काही कामासाठी त्यांच्या ग्राहकांना घेऊन गेला होता, तेथे बाजूला तो गुटखा खाऊन थुंकला यावरून दोघामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली, याचा राग मनात धरून केणे याने त्याच्या इतर साथीदारांना बोलावून मनिष जाधव कामावरून घरी जाताना गेटवर धक्का बुक्की करून हात पिरगळला म्हणून जाधव यांनी इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने खडकपाडा पोलीस ठाण्यात एजंट केणे याच्या विरोधात एनसी  दाखल केली व कार्यालयात काम बंद अंदोलन सुरू केले.


विशेष म्हणजे कल्याण उपप्रादेशिक कार्यालयात एकूण २२ खिडक्या आहेत, या प्रत्येक ठिकाणी नागरीकापेक्षा एंजटांंची अधिक गर्दी असते,आजमितीस एंजटाची संख्या १०० च्या वर गेली आहे, सर्व कामे आँनलाईन होत असल्याने ऐ टू झेड कामे एजंट करतात, हे महाशय फक्त सही शिक्याचे धनी ! या बदलत्या प्रत्येक एजटांंकडून यांना ठरलेला "सारा" बिनबोभाट वसूल केला जातो, हे कोणीही नाकारु शकणार नाही, असे असताना, सर्व कामे आम्ही करत असताना, तूम्हाला तूमचा मोबदला मिळत असताना, हे कर्मचारी मात्र मुद्दाम अडवणूक करतात.

ठाणे मध्ये एक, दोन दिवसांत गाड्या पासिंगच्या तारखा मिळत असताना, कल्याण मध्ये मात्र १/२ महिन्यानंतर देखील तारखा मिळत नाही, याबद्दल एजटांचा रोष होताच ? परंतु एंजटाना कोणत्याही प्रकारची कायदेशीर मान्यता नसल्याने ते उघडपणे बोलत नाहीत. हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे अधिच कोरोना, त्या नंतर महापूर, चक्री वादळ, कामधंदा नोकरी नाही अशा अनेक अडचणींत पिचलेल्या नागरिकांना आपल्या खिडकी वर आलेल्या लोकांना आपण खरेच न्याय देतों का? याचा विचार कामबंद करणाऱ्या कर्मचा-यानी करायला हवा ,तसेच आपणच वाढवलेली एंजटाची पिलावळ आपल्याच मानगुटीवर का बसतात ? याचही वरीष्ठांसह सर्वानीच आत्मपरीक्षण करायला हवे.


 

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...