Saturday, 11 December 2021

कुणबी समाजोन्नती संंघ,मुंबई शाखा महाड -पोलादपूर संकल्पित दिनदर्शिका - २०२२ चे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन !

कुणबी समाजोन्नती संंघ,मुंबई शाखा महाड -पोलादपूर संकल्पित दिनदर्शिका - २०२२ चे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन !


*मुंबई : दिपक कारकर*

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे उपरोक्त मंडळ गेली १६ वर्षे सातत्यपूर्ण दिनदर्शिका प्रकाशित करत असते. ह्यावर्षीची मंडळाची दिनदर्शिका - २०२२ नुकतीच बुधवार दि.०८ डिसेंबर २०२१ रोजी प्रकाशित झाली. यावेळी शाखा अध्यक्ष अनंत गावळकर, शाखा उपाध्यक्ष संजय उमासरे, विलास शिंदे, तसेच शाखा उपाध्यक्ष, संघ कार्यकारिणी सदस्य व पतपेढी अध्यक्ष सुधीर पेंढारकर, महीला अध्यक्षा सौ. ज्योती दिपक महाडीक, उपाध्यक्षा सौ. मौले मॅडम, महीला सचिव सौ. विनया विजय गोडांबे, शाखा सहसचिव शेखर कांदळेकर, राजेंद्र दवंडे, शाखा माजी सरचिटणीस तथा विद्यमान संघ कार्यकरिणी सदस्य सत्यवान यादव, खजिनदार विजय गोडांबे, युवाध्यक्ष समीर रेवाळे, सहसचिव मिलिंद चिबडे, प्रचार प्रमुख अशोक आंबेकर, पतपेढी उपाध्यक्ष रघुनाथ चिबडे, पतपेढी खजिनदार महादेव कदम, जगन्नाथ कांदळेकर, तसेच अनेक समाज बांधव उपस्थित होते. 

सदर कार्यक्रमाचे ॵचित्य साधून कलगी तुरा मुंबई मंडळाचे विद्यमान सरचिटणीस, भेलोशी मुंबई मंडळाचे अध्यक्ष संतोष गोविंद धारशे यांची महाराष्ट्र शासन सांस्कृतिक मंत्रालय कलाकार निवड समिती सदस्य पदी निवड झाल्याबद्दल शाखेच्या वतीने शाळ, पुष्पगुच्छ आणि राधा कृष्ण यांची आकर्षक प्रतीमा देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाखेचे सचिव दिपक महाडीक यांनी तर प्रास्ताविक शेखर कांदळेकर यांनी केले. व उपस्थितांचे आभार विलास शिंदे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...