Thursday, 16 December 2021

चार वर्षाचा ओम महादेव ढाकने यांचा मनसे तर्फ सत्कार !!

चार वर्षाचा ओम महादेव ढाकने यांचा मनसे तर्फ सत्कार !!


कल्याण,  हेमंत रोकडे 

सह्याद्री रॉक एडवेंचर गिर्यारोहक समूहाच्या कार्याने तीन चिमुकल्यांनी कल्याण नजीक असलेल्या मलंग गड सर केला आहे तीन हजार 200 फूट उंच असलेला गड साडेतीन तासात दोन कातळकडे केवळ एक लोखंडी पाइपला बांधून असल्याने त्यावर चाल करून मलंग गड सर केल्याचे धैर्य कल्याण मधील अवघ्या चार वर्षाचा ओम महादेव ढाकने या चिमुरड्याने केले. 


त्याबद्दल  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दि. १४/१२/२०२१ रोजी त्याचा सन्मान पत्र आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. 


आणि भविष्यात त्याने अजून पुढे जावं आणि असे अजून गड किल्ले सर करावी अश्या शुभेच्छा  देण्यात आल्या त्यावेळी सुरेखा शरद जगताप शाखा अध्यक्षा ९६ कल्याण पूर्व, उपजिल्हा अध्यक्ष रेणुका ताई शिरोडकर, शहर संघठक् सौ. वैशालीताई सोनटक्के, शाखा अध्यक्ष सौ. अनिता ताई गुडेकर तसेच श्री. अंकुश बल्लाळ*  महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना राज्य कार्यकारणी सदस्य), श्री राहुल जाधव ( वॉर्ड क्र ४० शाखा अध्यक्ष) हे सर्व उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे मुंबईमध्ये “कोकणरत्न” या मानाच्या पदवीने अनेकांचा होणार गौरव !

स्वतंत्र कोकणराज्य अभियान तर्फे मुंबईमध्ये “कोकणरत्न” या मानाच्या पदवीने अनेकांचा होणार गौरव ! मुंबई (शांताराम गुडेकर)          ...