महाराष्ट्र युवा फाऊंडेशन विरार, स्टार हाॅस्पीटल नालासोपारा, डाॅ.शुक्ला आय अँड डेन्टल क्लिनिक नालासोपारातर्फे मोफत आरोग्य शिबिरला उत्स्फूर्त प्रतिसाद !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
महाराष्ट्र युवा फाऊंडेशन विरार यांच्या वतीने आणि स्टार हाॅस्पीटल, नालासोपारा तसेच डाॅ.शुक्ला आय अँड डेन्टल क्लिनिक नालासोपारा यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळा, गांधीचौक, फुलपाडा येथे आज दिनांक १९ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या मोफत आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच यावेळी शिबिराला बहुजन विकास आघाडीचे मा.श्री. किशोरजी पाटील, मा.श्री. निशादजी चोरघे, मा.श्री. धनंजयजी झा, शिवसेनेचे मा.श्री. निलेशजी कानकाटे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मा.श्री. जय जैतापकर यांनी आवर्जून उपस्थिती दाखवली. तसेच महाराष्ट्र युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. निखिल जांभळे, सचिव. श्री. विनायक भोसले, उपाध्यक्ष श्री सतिश जांभळे, नितिन जांभळे, नंदकुमार माने, मितेश पाटील, संजय कदम, सुधांशू कदम, प्रणित जाधव, प्रसन्न गुरव, प्रथमेश गुरव, पुष्पराज गुरव, प्रशांत गुरव, रुपेश गुरव, सेजल डिंगणकर, कांबळे मॅडम आणि महाराष्ट्र युवा फाऊंडेशनचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र युवा फाऊंडेशनच्या सर्व सभासदांनी अथक परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment