कल्याण डोंबिवली शहर, जिल्हा, ओबीसी विभाग कॉंग्रेस कमिटी जाहीर !!
कल्याण, हेमंत रोकडे (दि. १९) :
कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग यांची जिल्हा कमिटी रविवारी जाहीर करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे प्रकाश मुथा, सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, लखपती राजपूत, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, ओबीसी विभाग ओमप्रकाश पांडे, माजी नगरसेवक बाबा तिवारी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
तसेच यावेळी मान्यवरांनी नियुक्ती पत्रक वाटप करत भाषण केले आणि जयदीप सानप यांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या. कल्याण जिल्हा अध्यक्ष जयदीप सानप यांनी काँग्रेस पक्ष बळकट करू तसेच ओबीसी आरक्षण साठी संघर्ष करू वा ओबीसी आरक्षण मान्य होत नाही तो पर्यंत निवडणुका घेऊ नये असे जाहीर करण्यात आलेय. तसेच प्रांत अध्यक्ष नाना पटोले, भानुदास माळी, ओबीसी अध्यक्ष यांनी दिलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडू असे संभाषण व्यक्त केले. सानप यांच्या हस्ते नियुक्ती पत्रक वाटप करण्यात आले त्या वेळी एकूण ३८ लोकांची पुढील प्रमाणे कमिटी जाहीर करण्यात आली.
विधानसभा क्षेत्र अध्यक्ष :-
राजा जाधव; कल्याण (प.)
भालचंद्र बर्वे; कल्याण (पू.)
निवृत्ती जोशी; डोंबिवली शहर
सूर्यकांत मंडपे; डोंबिवली ग्रामीण
संघटक :-
रीना खांडेकर
हाफीज कुरेशी
नितीन चौधरी
दशरथ नाईक
सचिव :-
यादव माणिक सानप
विनोद शिंपी
विद्या चैव्हान
सतीश गुप्ता
सरचिटणीस :-
भीमराव राठोड
मुन्ना यादव
रियाज सय्यद
अनिल पवार
उपाध्यक्ष :-
प्रियंका बांगर
मदन जयराज
हरिश्चंद्र पतीलत
चंद्रकांत पाटील
प्रसिद्धी प्रमुख :-
कोणार्क देसाई
यांची नेमणूक करण्यात आली. यावेळी जिल्हा सदस्य रामेश्वर पवार, जावेद शेख, शफीक शेख, वैशाली शिंपी, अंकित अहेर, रॉकी राजपूत, सुमित जाधव, रोहन अग्रवाल, अय्यर, संदीप बिमल, फयाज मुल्ला, राजेश शेट्टी उपस्थीत होते.





No comments:
Post a Comment