सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांचा राष्ट्रवादीत प्रवेश !! "सर्व चर्चांना पुर्णविराम"
अनेक समर्थकांसह राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव व ठाणे महानगरपालिकेचे गटनेते नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश प्रवेश केला.
सुरेश म्हात्रे यांनी गेल्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नव्हता. तेंव्हापासून होत असलेल्या चर्चांना पुर्णविराम देत गुरुवारी ( आज ) त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी सुरेश म्हात्रे म्हणाले की , राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्यावर दाखविलेला विश्वास आपण पूर्णपणे सार्थ ठरवू आणि पक्ष जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करू.
No comments:
Post a Comment