कल्याणच्या गिर्यारोहकांचं "पर्यावरण वाचवा" चा संदेश. १००० फुटवरील जीवधन-वानरलिंगी व्हॅली क्रॉसिंग केल !!
कल्याण, हेमंत रोकडे : नाणेघाटाच्या बाजूलाच असलेला जीवधन किल्ला आणि त्याच्याच बाजूला सुमारे 200 फूट लांब असलेला वानरलिंगी सुळखा ह्या दोन्ही कड्यांच्या सुमारे १००० फूट उंचवरुन लटकून झिप्लायनिंग च्या मदतीने कल्याणच्या गिर्यारोहक भूषण पवार आणि नीतेश पाटील ह्यांनी पर्यावरण वाचवा संदर्भातचा सामाजिक संदेश दिला. नाणेघाटाच्या पायथ्यापासून ट्रेक ला सुरुवात होताच सुमारे सुमारे एक तासाची पायपीट केल्यावर जीवधन किल्ल्याचे वैभव डोळ्या समोर येते त्याच सोबत किल्याच्या दुसऱ्या कड्यावरून समोर दिसतो तो ४५० फुटांचा वानरलिंगी सुळखा. जीवधन किल्ल्याचा माथा गाठण्यासाठीची सुरुवातचं ही घनदाट जंगलातून होतं असल्याने विविध प्रकारच्या हिंस्र प्राण्यांची भीती ही असतेच. ह्या सर्व गोष्टींवर मात करून कल्याणच्या ह्या दोन्ही गिर्यारोहकांनी एक सामाजिक संदेश दिला.
व्हॅली क्रॉसिंग :-
व्हॅली क्रॉसिंग म्हणजे दोन गडांच्या मधील अंतर हे दोरीला लटकून पूर्ण करणे. जीवधन आणि वानरलिंगी मधील अंतर हे सुमारे २०० फूट उंच असून जमिनीपासून १००० फूट उंच आहे, जरा चूक झाली तर सरळ दरीत पडून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे अश्या जोखमीच्या मोहिमेत सुरक्षा प्रथम प्राधान्य ठेवलेले असते.
वानरलिंगी करून पर्यावरण वाचवाचा संदेश :-
झिप्लायनिंग करून वानरलिंगी सुळख्यावर पोहचताच कल्याणच्या ह्या दोन्ही गिर्यारोहकांनी पर्यावरण वाचवा म्हणून एक सामाजिक संदेश देण्याचा उपक्रम केला. त्यांना विशेष साथ लाभली ती SL ऍडव्हेंचरच्या लहू उगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची.
राज्यात ठिकठिकाणी असलेला गड त्यांच्या सोबत मानवाने आपल्या स्वार्थासाठी उत्खनन करून गडाचं पावित्र्य हे धोक्यात आणले आहे त्यात सर्वप्रथम स्थान मिळते ते श्री हनुमानाचे जन्मस्थान असलेल्या अंजनेरी किल्ल्याचे. अश्या पर्यावरण धोक्यात घालून आपणच आपले भविष्य धोक्यात आणतोय असे भूषण पवार ह्यांनी सांगितले.
दिसायला जरी बारीक असली तरीही ह्या रोप वर पूर्ण विश्वास असल्याने, पडण्याची भीती अजिबात वाटतं नाही असे वक्तव्य नितेश पाटील ह्यांनी केले.
No comments:
Post a Comment