Sunday, 2 January 2022

ठाणे -अंबरनाथ येथे डोक्यात दगड घालून 25 वर्षीय तरुणाची हत्त्या करणाऱ्या आरोपीला अटक.!!

ठाणे -अंबरनाथ येथे डोक्यात दगड घालून 25 वर्षीय तरुणाची हत्त्या करणाऱ्या आरोपीला अटक.!!


भिवंडी, दिं,3अरुण पाटील (कोपर) :
ठणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये एका २५ वर्षीय तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या करून फरार झालेल्या आरोपीला पोलीसानी काही तासातच अटक केली आहे. बंद पडलेल्या कंपनीच्या आवारात क्रिकेट खेळण्यास गेलेल्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला आहे.
एकीकडे नववर्षाच्या रात्रीला तरुणाई स्वागत करत असतानाच त्याच दिवशी रंगात भंग करणारी घटना घडली आहे. एका २५ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञात मारेकऱ्यांनी दगड घालून त्याची निर्घृण हत्या केली आहे. ही घटना अंबरनाथच्या डीएमसी कंपनीच्या आवारात घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
रवी किशोर तिवारी असे हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.तर समीर आसिफ मोमीन असे आरोपीचे नाव आहे.मयत रवी हा एका कंपनीत लेबर कॉन्ट्रॅक्टरचे काम. करत होता. त्यांने  लेबर पुरावण्याचे काम. करू नये या कारणावरून आरोपी समीर याने दगड टोक्यात घालून रवी याची हत्त्या करून फरार झाला होता. मात्र पोलिसांनी कसून तपास करून आरोपीला काही तासातचअटक केली.
       अंबरनाथ पश्चिमकडे बंद पडलेल्या डीएमसी कंपनीचे बोराक्स पावडर साठवण केंद्र होते. त्या ठिकाणी परिसरातील काही स्थानिक युवक क्रिकेट खेळण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना डोक्यात दगड घातल्याने मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह दिसला. त्यांनी तात्काळ कंपनीच्या वॉचमनला घटनेची माहिती दिली. त्यानंतर अंबरनाथ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते, पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश गायकवाड यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात रवाना केला.

No comments:

Post a Comment

नवी मुंबई मधील भूमीहिन शेतमजूर, मिठागर कामगार, बाराबलूतेदार यांना मिळाला न्याय ! मनोज कोळी, मयूर कोळी यांच्या पाठपुराव्याला यश !!

नवी मुंबई मधील भूमीहिन शेतमजूर, मिठागर कामगार, बाराबलूतेदार यांना मिळाला न्याय ! मनोज कोळी, मयूर कोळी यांच्या पाठपुराव्याला यश !! ** मा. उच्...