Sunday, 2 January 2022

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील नाव "न" दिल्यास काम बंद पाडण्याचा कृती समितीचा इशारा !!

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील नाव "न" दिल्यास काम बंद पाडण्याचा कृती समितीचा इशारा !!


भिवंडी, दिं,3, अरुण पाटील (कोपर) :
          नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव "न" दिल्यास व  विविध प्रलंबित मागण्या  पूर्ण "न" झाल्यास नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम बंद पाडण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे.
         नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित  तसेच लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय कृती समितीने जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर विमानतळाचे काम बंद पाडू असा इशारा सिडको प्रशासनाला दिला आहे. नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम जोरदार सुरू आहे. मात्र, सिडकोच्या माध्यमातून प्रकल्प ग्रस्तांचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी सिडको टाळाटाळ करत आहे. या विमानतळबाधित नागरिकांनी कृती समितीच्या माध्यमातून बारा मागण्या केल्या आहेत. यामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसह अनेक मागण्यांचा समावेश आहे.
         आंदोलनातील  मागण्यांसाठी व प्रलंबित प्रश्नांची सिडकोच्या माध्यमातून सोडवणूक होत नसल्यान विमानतळ बाधित गावे व लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून येत्या 13 जानेवारीला निर्धार परिषद घेण्यात येणार आहे. येत्या 24 जानेवारीला विमानतळाचे कामबंद आंदोलन करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...