Monday, 3 January 2022

सौ.उपेक्षा भोईर यांच्या जन्मदिवसाच्या औचित्यावर मांडा- टिटवाळ्याच्या वैभवात भर घालणार्‍या कोळी-आगरी सांस्कृतीक शिल्पाचे व वाजपेयी चौकचा लोकार्पण संपन्न !!

सौ.उपेक्षा भोईर यांच्या जन्मदिवसाच्या औचित्यावर मांडा- टिटवाळ्याच्या वैभवात भर घालणार्‍या कोळी-आगरी सांस्कृतीक शिल्पाचे व वाजपेयी चौकचा लोकार्पण संपन्न !!


कल्याण, हेमंत रोकडे : कार्यसम्राज्ञी नगरसेविका तथा कल्याण डोंबिवली महानगपालिकेच्या मा. उपमहापौर सौ. उपेक्षा शक्तिवान भोईर यांच्या जन्मदिवसाच्या औचित्यावर शनिवार दि.१ जानेवारी २०२२ रोजी स्व. रविंद्र वाजपेयी चौक, बल्याणी रोड मांडा येथे मांडा- टिटवाळ्यातील समस्त कोळी आगरी बांधवांची बर्‍याच वर्षाची मागणी पुर्ण करण्यात आली व बहु प्रतिक्षित अशा कोळी-आगरी सांस्कृतीक शिल्पाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


माजी आमदार मा.श्री.नरेंद्र पवार साहेब यांच्या निधीतून व माजी उपमहापौर/नगरसेविका सौ. उपेक्षा शक्तिवान भोईर यांच्या प्रयत्नाने या कोळी आगरी सांस्कृतिक शिल्पाचे लोकार्पण व स्व.रविंद्र वाजपेयी चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले.

या कार्यक्रमाची सुरुवात आई एकवीरा मची पूजा करण्यात आली. या शिल्पाचे व चौकाचे उद्घाटन व अनावरण नामदार मा. श्री कपिल पाटील साहेब (केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री, भारत सरकार) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री.रमेशदादा पाटील (विधान परिषद सदस्य तथा राष्ट्रीय अध्यक्ष कोळी महासंघ) मा. श्री. नरेंद्र पवार साहेब (मा.आमदार तथा प्रदेश संयोजक भाजपा भ.वि.आ.) यांची उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर माजी उपमहापौर सौ. उपेक्षा भोईर, भाजपा मोहने-टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तीवान भोईर, भाजपा नेते राजाभाऊ पातकर जेष्ठ ग्रामस्त मांडा कोळीवाडा माजी सरपंच बालकृष्ण भोईर प्रभाकर पाटील, शरदशेठ वाजपेयी, श्वेता रविंद्र वाजपेयी, माजी नगरसेविका शारदा गायकवाड, ह.भ.प.माधव केशव महाराज, श्रीराम पाटील, चंदु बोष्टे, योगेश धुमाळ, शारदा पाटील, नवनाथ पाटील, सुभाष पाटील यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे वैशिष्ठ म्हणजे परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यमाचे प्रास्ताविक सौ. उपेक्षा भोईर यांनी केले. याप्रसंगी त्यांनी मांडा टिटवाळ्याचे शहरीकरण झपाट्याने होत असताना गावची संस्कृती टिकून राहिली पाहिजे यासाठी सतत मनात विचार होते, ग्रामस्त मंडळींची तशी मागणी होत होती आणि यातून कोळी- आगरी सांस्कृतिक शिल्प उभारण्याचे ठरले. महापालिकेत तसा ठराव मांडला आणि सर्व पक्षीय आगरी कोळी नगरसेवकांनी पाठिंबा दिला व हा ठराव मंजुर झाला यासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करते अशी भावना व्यक्त केली. या शहरातील प्रत्येक समाज व घटक माझे आहेत म्हणून मी काम करते. आमच्या या संकल्पनेसाठी माजी नरेंद्र पवार साहेबांनी निधी उपलब्ध करुण दिला त्यामूळेच आज प्रत्यक्षात हि वास्तू अस्तित्वात आली आहे त्याबद्दल मी त्यांचे खुप खुप आभार मानते व या परिसरातील कोळी व आगरी समाज कायम त्यांच्या ॠणात राहिल अशी भावना व्यक्त केली. मा. श्री. शरद वाजपेयी यांनी सुध्दा सहमती दिली त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त केले. मांडा टिटवाळ्याच्या सौंदर्यात या शिल्पामुळे भर पडली असून यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचेही म्युलर उभे केले आहे व पुढील काही दिवसात स्वामी विविकानंद चौक येथे स्वामी विवेकानंदाचे अतिशय सुंदर असे म्युलर व चौकाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे असे सांगीतले. मांडा -टिटवाळ्याची गरज ओळखून अग्निशामन केंद्र आणले आहे. प्रभागात रस्ते झाले आहेत व बरिच कामे प्रस्तावित आहेत तसेच आता सुशोभीकरणाची सुरुवात केली आहे. यावेळी उपूक्षा भोईर यांनी असेही सांगितले कि, त्या वार्ड क्र.९ च्या जरी नगरसेविका असल्या तरी त्यांनी बल्याणी, मांडा (पूर्व/पश्चीम) व टिटवाळा परिसरातील नागरिकांच्या प्रत्येक समस्येकडे लक्ष दिले आहे. प्रत्येक ठिकाणच्या प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी प्रयत्न केले आहेत व ते प्रश्न मार्गी लावले आहेत. भविष्यात या परिसरात आगरी कोळी सांस्कृतिक भवणासाठी त्या प्रयत्नशील आहेत. जागेचा ठराव झाला असुन निधी ची आवश्यकता पडणार आहे त्यासाठी त्यांनी खा. कपिल पाटील व आ. रमेश पाटील साहेब यांना निधी देण्याची विनंती केली.मी हि सर्व कामे पक्षाची वरिष्ठ नेते मंडळी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्व नागरिकांच्या सहकार्यामुळे व आशिर्वादामुळेच करु शकत आहे त्यामुळे सर्वांचे आभार मानते अशी भावना व्यक्त केली.

याप्रसंगी आ. रमेश पाटील यांनी सौ. उपेक्षा भोईर यांच्या कार्याचे कौतुक केले, जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि कायम सहकार्य राहिल असा शब्दही दिला. माजी आमदार नरेंद्र पवार यांनी समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेणे, वार्डाच्या पलिकडे जाऊन लोकांच्या समस्या सोडविणे, महापूर व कोरोणा काळातील केलेल्या कार्यासाठी उपेक्षा भोईर यांचे अभिनंदन केले व या परिसरातील नागरिक त्यांना कधिही विसरणार नाहीत असे मत व्यक्त केले. पुरामध्ये नावेत बसुन स्वत:च्या जीवाची पर्वा न करता लोकांच्या घरापर्यत उपेक्षा व शक्तीवान जात होते त्यांना सर्व साहित, जेवण पुरवित होते त्यामुळे या चौकातून जाताना लोकांना या शिल्पातील नावेत उभी असलेली जोडी हि उपेक्षा आणि शक्तीवान आहेत असाच भास होत राहिल अशी भावना माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केली व जन्मदीवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

यावेळी केंद्रिय राज्यमंत्री कपिल पाटील यांनीही उपेक्षा भोईर यांच्या कार्याचे खुप कौतुक केले. उपेशा हि खर्‍या अर्थाने समाज्या सर्व प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहणारी आदर्श लोकप्रतिनीधी आहे. या कार्यक्रमासाठी समाजातील सर्व घटक, सर्वपक्षीय लोक उपस्थित आहेत हिच तीच्या कार्याची पोचपावती अशी भावना मंत्री कपील पाटील यांनी व्यक्त केली व पुढील राजकिय भविष्यासाठी उपेक्षा भोईर यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी खुप मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. हा कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री.अनिल फड व भरत दळवी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. शक्तीवान भोईर यांनी केले.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...