भाजप आमदार नितेश राणे यांना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी, संतोष परब हल्ल्याप्रकरणी कारवाई !!
भिवंडी, दिं,03, अरुण पाटील : नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. कोर्टाने त्यांना 4 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे राणेंना रात्र कणकवली पोलीसांच्या कोठडीतच काढावी लागणार आहे.
दरम्यान, नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली दिवाणी न्यायालयात शरण अर्ज दाखल केला. त्यानंतर नितेश राणे यांच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. तर सरकारी वकिलांकडून नितेश राणेंच्या पोलीस कोठडीची मागणी केली. या मागणीसाठी पोलिसांना सबळ कारणे दिले. त्यामुळे नितेश राणेंना पोलिस कोठडी सुनावली आहे.
काल कणकवली दिवाणी न्यायालयात सुनावणी सुरु असल्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दंगल नियंत्रण पथक न्यायालयाबाहेर तैनात होते.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे वादाच्या भोवर्यात अडकले. 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते

No comments:
Post a Comment