Wednesday, 2 February 2022

नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळला, आता उच्च न्यायालयात जाणार !!

नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळला, आता उच्च न्यायालयात जाणार !!


भिवंडी, दिं,०२, अरुण पाटील (कोपर) : भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या नितेश राणेंना आता आणखी एक झटका बसला आहे. 

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी आता भाजपचे आमदार नितेश राणे चांगलेच अडचणीत येताना दिसत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने आमदार नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला त्यानंतर नितेश राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, आता मुंबई उच्च न्यायालयाने नितेश राणे यांना सर्वप्रथम सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हा नितेश राणे यांच्यासाठी एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. 

सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने आज नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला. १११ पानांचा जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. 

सिंधुदुर्ग सेशन्स कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला. कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी नितेश राणे यांची गाडी थांबवली. यावेळी नितेश राणे यांचे भाऊ माजी खासदार निलेश राणे यांनी पोलिसांना अडवलं. यावेळी निलेश राणे आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. नितेश राणे यांच्या जामीन अर्जाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे. त्यामुळे आम्हाला जाऊ द्या. कोर्टाची ऑर्डर द्या, असं निलेश राणे आक्रमकपणे पोलिसांना म्हणाले. 

जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यासाठी निघाले होते. ते आपले वकील सतीश मानेशिंदे यांच्यासोबत कोर्टाबाहेर पडले आणि गाडीत बसले. यावेळी सिंधुदुर्ग पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. पोलिसांचा मोठा ताफा आजूबाजूला जमा झालेला बघायला मिळाला. पोलीस नितेश राणे यांना आता अटक करतील, अशी शक्यता होती. पण नितेश राणे यांचे भाऊ निलेश राणे धावून आले. त्यांनी पोलिसांसोबत बाचाबाची केली. पोलिसांना अटक करण्याचा अधिकार नाही, असं निलेश राणे ठामपणे म्हणाले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी देखील पोलिसांसमोर तीच भूमिका मांडली. अखेर मानशिंदे यांना कोर्टात जाऊन सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना जाण्यास परवानगी दिली. 

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. या हल्ल्याचा कट रचण्यात आमदार नितेश राणे यांचा सहभाग होता, असा आरोप परब यांनी केला आहे. या हल्ल्याच्या कटाचे धागेदोरे नितेश राणे यांच्यापर्यंत कसे पोहोचतात, याचे पुरावे सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयात सादर केले होते. त्यामध्ये काही कॉल डिटेल्सचाही समावेश होता. त्याची खातरजमा करण्यासाठी नितेश राणे यांचा फोन जप्त करणं गरजेचं आहे, असा युक्तीवाद त्यांनी केला होता. या प्रकरणाचा तपास निष्पक्षपातीपणे होण्यासाठी नितेश राणे अटकेत हवे आहेत, असा दावा सरकारी वकिलांनी केला होता. हा दावा मान्य करत कोर्टानं नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

No comments:

Post a Comment

भारत-पाक बॉर्डरच्या राज्याचा पाद्यपूजन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न !!

भारत-पाक बॉर्डरच्या राज्याचा पाद्यपूजन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न !! मुंबई, (केतन भोज) : मुंबई येथील भारतीय नौदलाच्या बेस शेज...