Wednesday, 2 February 2022

विरोधामुळे वाईन संधर्भातील निर्णय बदलला तर वाईट वाटणार नाही _शरद पवार.

विरोधामुळे वाईन संधर्भातील निर्णय बदलला तर वाईट वाटणार नाही _शरद पवार.


भिवंडी, दिं, ०२, अरुण पाटील (कोपर) : सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला दिलेली परवानगी आणि त्याला होत असलेला विरोध हा काही फार चिंतेचा विषय नाही. जर अनेक स्तरातून विरोध होत असेल आणि राज्य सरकारने या संदर्भात निर्णय बदलला, तरी त्याचे मला वाईट वाटण्याचे कारण नाही, असे मत ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. 

देशभरातील सर्वच राज्यांमध्ये दुकानांमध्ये देशी आणि विदेशी दारू मिळते. त्यामध्ये वाईनचा खप तुलनेने अत्यंत कमी आहे. देशातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात होते. या जिल्ह्यामध्ये १८ वाईनरी आहेत. ही वाईन केवळ मोठ्या मॉल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकारने मंजुरी दिली आहे. 

वायनरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र त्याला विरोध होत असेल, तर सरकारने या संदर्भात काही वेगळा निर्णय घेतला तरी वाईट वाटायचे कारण नाही असेही पवार यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

विविध उपक्रम राबवून अजित दादा पवार यांचा वाढदिवस वाडा तालुक्यात साजरा !!

विविध उपक्रम राबवून अजित दादा पवार यांचा वाढदिवस वाडा तालुक्यात साजरा !! वाडा, प्रतिनिधी : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा र...