Saturday, 12 March 2022

आर एस पी कमांडर मनिलाल शिंपी यांना जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे महाराजा सयाजीराव गायकवाड सेवा रत्न पुरस्कार 2022 प्रदान !!

आर एस पी कमांडर मनिलाल शिंपी यांना जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे महाराजा सयाजीराव गायकवाड सेवा रत्न पुरस्कार 2022 प्रदान !! 


कल्याण, संदीप शेंडगे : उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद आयोजित अहिराणी पर्व व जागतिक अहिराणी दिनानिमित्त महाराजा सयाजीराव गायकवाड सेवा रत्न पुरस्कार 2022 या कार्यक्रमाचे आयोजन  कार्याअध्यक्ष महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ बापूसाहेब हटकर यांच्या अध्यक्षतेखाली माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण व माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या *आर एस पी कमांडर मनिलाल शिंपी यांना महाराजा सयाजीराव गायकवाड सेवा रत्न पुरस्कार 2022 देऊन सन्मानित करण्यात आले.* तसेच याप्रसंगी शासकीय-निमशासकीय प्रशासकीय सामाजिक सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमधील मान्यवरांना महाराजा सयाजीराव गायकवाड सेवा रत्न पुरस्कार 2022 देऊन सन्मानित करण्यात आले. वाहतूक पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील, खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील, कोषाध्यक्ष ए. जी.पाटील, उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...