Friday, 25 March 2022

28/ 29 मार्च रोजी मोदी सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात देशव्यापी संप !! "यशस्वी करा .. आयटक"

28/ 29 मार्च रोजी मोदी सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात देशव्यापी संप !! "यशस्वी करा .. आयटक"


जळगाव, बातमीदार.. येत्या 28/29 मार्च सोमवार व मंगळवार रोजी मोदी सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात व चार कामगार संहिता रद्द करा या मागणी सह इतर मूलभूत मागण्यांसाठी देशव्यापी संप पुकारण्याच्या निर्णय महाराष्ट्र राज्य कामगार संघटना संयुक्त कृती समितीने घेतला आहे. या संयुक्त कृती समितीत आयटक इंटक सिटू सह बँक विमा सरकारी कर्मचारी कामगार फेडरेशन ट्रान्स्पोर्ट युनियन रेल्वे नगरपालिका/ महानगरपालिका कर्मचारी संघटना, कंत्राटी कर्मचारी, शेतमजूर युनियन किसान सभा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ आशा व गटप्रवर्तक संघटना सी आर पी एफ एल सी आर पी मध्यान भोजन शालेय पोषण आहार कर्मचारी आदी योजना कर्मचारी यांच्या संघटनांचा समावेश आहे. तरी या संपात जळगाव जिल्ह्यातील सर्व संबंधित कामगार संघटनांनी सहभाग व्हावे काम बंद ठेवावे संप यशस्वी करावा असे आव्हान जळगाव जिल्हा आयटक तर्फे करण्यात आले आहे.

संयुक्त कामगार कृती समितीने सरकारला सादर केलेल्या मागण्या अशा.. वीज दुरुस्ती विधेयक रद्द करा सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण बंद करा  रोजगार हमी योजना शहरी भागात विस्तार करा सर्व असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी पेन्शन, विमा नोकरीची शाश्वती, आरोग्य सुविधा लागू करा अंगणवाडी, आशा, माध्यान्ह भोजन आणि यादी सीआरपी सीआरपी आदी योजनांसाठी किमान वेतन राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे पुनर्जीवन करण्यासाठी श्रीमंत वर्गाकडून ज्यादा कर वसूल करा तो कृषी शिक्षण आरोग्य व इतर महत्त्वपूर्ण सामाजिक सुरक्षा सुविधांच्या गुंतवणुकीत टाका. ग्रामपंचायत कर्मचारी यांना नवीन किमान वेतन प्रमाणे पगारवाढ व पगारासाठी 100% अनुदान द्या 60 वर्षावरील असंघटित कर्मचाऱ्यांना 7 हजार रुपये पेन्शन द्या. श्रावणबाळ, किसान सन्मान योजनाचे किमान मानधन तीन हजार रुपये करा. गॅस डिझेल पेट्रोल औषधी बी बियाणे औषधे अवजारे यांची दरवाढ रद्द करा. आदी मागण्यांचा सरकारला सादर केलेल्या निवेदनात समावेश असून सरकारचे कामगार विरोधी धोरण हाणून पाडण्यासाठी या संपात सहभागी व्हावे असे आवाहन आयटकचे राज्य उपाध्यक्ष राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड अमृत महाजन, विज वर्कस फेडरेशनचे कॉम्रेड वीरेंद्र पाटील, तसेच तसेच आयटक संबंधित सर्व युनियन पदाधिकारी कॉम्रेड प्रेमलता पाटील, ममता महाजन, वत्सला पाटील सुलोचना साबळे, मीनाक्षी सोनवणे, शारदा महाजन, अश्विनी देशमुख, अरुण सपकाळे, प्रतिभा पाटील, संतोष खरे, किशोर कनडारे, रतीलाल पाटील, रवींद्र पाटील मच्छिंद्र पाटील, रमेश पाटील, मुस्ताक शेख, प्रदीप जोशी सुमित्रा बोरसे, नंदा वाणी, महेंद्र धनगर, सुलक्षणा पाटील राजू खरे, निलेश पाटील, प्रदीप तांगडे, रतनाबाई धनगर, मीनाक्षी काटोले, चंद्रकला चिंचोरे, मुरलीधर जाधव, विद्या पाटील, यमुनाबाई धनगर, उषा पाटील, देवेश्री कोळी, बावस्कर बाई, फरीन, लक्ष्मी तायडे, मंदा पाटील, संगीता पाटील, सीमा बागड आदींनी केले आहे. 

*जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा*

या  संपकाळात दिनांक 28 मार्च सोमवारी महात्मा गांधी उद्यान बस स्थानक जवळून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी दहा वाजता प्रचंड मोर्चा आयोजित केला आहे तरी सर्व कर्मचाऱ्यांनी वेळेवर जमावे असे आवाहनही जिल्हा आय टकने केले आहे

No comments:

Post a Comment

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित !

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित ! मुंबई (शांताराम गुडेकर)                सेनादल अधिकारी तथा सीबीआय ...