Thursday, 24 March 2022

कल्याण- आधारवाडी कचरा भूमीला वारंवार लगणाऱ्या आगीमुळे नागरिक त्रस्त, मिथेन वायुमुळे लागते आग तज्ञानचें मत !!

कल्याण- आधारवाडी कचरा भूमीला वारंवार लगणाऱ्या आगीमुळे नागरिक त्रस्त, मिथेन वायुमुळे लागते आग तज्ञानचें मत !!


दिं,२४, अरुण पाटील (कोपर) :
          कल्याण येथील आधारवाडी कचरा भूमीला (डम्पिंग ग्राउंड) वारंवार आगी लागण्याच्या घटणांनमुळे परिसरातील नागरिक कमालीचे त्रस्त असतानाच  गुरुवारी संध्याकाळी पुन्हा भीषण आग लागली. धुराचे लोट शहराच्या दिशेने आल्याने रहिवाशांमध्ये गुदमरल्या सारखे वाटू लागले होते. आग लागल्यानंतर जोरदार वारे सुटल्याने आगीने उग्र रूप धारण केले होते. उन्हाने तप्त झालेला कचरा आणि त्यात आग लागल्याने आगीच्या ज्वाला २० ते २५ फूट उंच जात होत्या.
            आगीची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली पालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्याचे काम करत आहेत. जोरदार वारे आणि आगीने धारण केलेले उग्र रूप त्यामुळे जवानांची आग विझवताना दमछाक होत आहे.
         काही दिवसापूर्वीच आधारवाडी कचरा भूमीला रात्रीच्या वेळेस भीषण आग लागली होती. विविध प्रकारचा कचरा आधारवाडी कचरा भूमीवर असल्याने. दिवसा हा कचरा तप्त होऊन त्यामधून मिथेन वायू तयार होतो. त्यामुळे आगी लागतात असा निष्कर्ष यापूर्वीच तज्ञांनी काढला आहे.

No comments:

Post a Comment

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित !

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष मंगेश अंकुश रासम सन्मानित ! मुंबई (शांताराम गुडेकर)                सेनादल अधिकारी तथा सीबीआय ...