Sunday, 13 March 2022

5/ड प्रभागातील मोबाईल बुस्टर अँटीनाच्या बांधकामावर आणि 4/जे प्रभागातील अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई !

5/ड प्रभागातील मोबाईल बुस्टर अँटीनाच्या बांधकामावर आणि 4/जे प्रभागातील अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई !


कल्याण, हेमंत रोकडे : महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार 5/ड प्रभागाच्या सहा. आयुक्त सविता हिले यांनी शंकर पावशे रोड, साईबाबा नगर, काटेमानिवली येथील मोबाईल बुस्टर अँटीनाच्या बांधकामावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई (डी. पी. एल.) पूर्ण  केली व प्रथम सदर मोबाईल बुस्टर अँटीना, ड प्रभागातील पथक व मनपा ठेकेदारांचे कर्मचारी यांचे मार्फत काढण्याची कारवाई सुरू करून वरचे पार्टस काढण्यात आले आणि हायड्रा  उपलब्ध  झाल्यावर अवजड पार्टसवरील उर्वरित कारवाई करण्यात आली. 


4/ जे प्रभागातही सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी  चिकणीपाडा, कल्याण (पू), येथील गायकवाड यांच्या  1+1 इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची कारवाई  जेसीबीच्या सहाय्याने तसेच महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने केली.


No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...