साधकांना निरोगी, आनंदी आणि आदरयुक्त जीवन जगण्याचा मुल मंत्र सापडला, रायते आश्रमात तेजस्वी युवा शिबीर संपन्न !!
कल्याण, (संजय कांबळे) :
मुरबाड रोड, रायता तालुका कल्याण येथील परम पूज्य संत श्री आशारामजी आश्रमात महाराष्ट्र अखिल भारतीय साधक सम्मेलन २०२२ आयोजित करण्यात आल होत. ज्यामध्ये परम पूज्य संत श्री आशारामजी बापूंच्या कृपाशिष्या साध्वी रेखा दीदी आणि साध्वी सुशीला दीदी यांच्या उपस्थितीत तरुण पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी एक आकर्षक युवा शिबिर आणि सत्संग कार्यक्रमाचे दोन दिवस आयोजन करण्यात आले होते. सत्संगात सेवा पद्धती कशी वाढवायची, समाजोन्नतीच्या ईश्वरी कार्यात सहभागी कसे व्हायचे इत्यादी गोष्टी समित्यांना सांगण्यात आल्या.
समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
साध्वी रेखा दीदी यांनी समाजातील प्रत्येक घटकाला सनातन संस्कृतीच्या उच्च आदर्शांची ओळख करून देण्याची शपथ घेतली.
युवकांच्या संपत्तीच्या रक्षणासाठी ब्रह्मचर्य पाळण्यावर साध्वी सुशीला दीदी यांचे सत्र घेण्यात आले. पंचस्करी साधनेचे महत्त्व सांगताना सुशीला दीदी म्हणाल्या की, तरुणाई ही सामर्थ्य आणि उर्जेने परिपूर्ण असते. यामध्येही संयम आणि परोपकाराची भावना असेल तर तरुणांना प्रत्येक कामात यश मिळू शकते. तरुण पिढीच्या पाठोपाठ पुढची पिढी येते.
अखिल भारतीय वेदांत सेवा समिती चे अध्यक्ष राकेश भाई म्हणाले की तरुणांमध्ये केवळ स्वतःचे जीवनच नाही तर संपूर्ण जग बदलण्याची क्षमता आहे.
अखिल भारतीय युवा सेवा संघाचे प्रमुख श्री.संजय भाई यांनी युवकांचे संघटन मजबूत करणे व समाजसेवेचे कार्य वाढविण्यावर चर्चा केली. ऋषी प्रसादचे रामाशिष भाई म्हणाले या शिबिरात तरुणांना ध्यान, प्राणायाम, योगासने यांसारखे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे प्रयोग शिकवण्यात आले. ब्रह्मचर्य आणि संयम शिकवणारा दैवी प्रेरणादायी प्रकाश एक लाख तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला.
तसेच महाराष्ट्राच्या विविध समित्यांमधील ज्येष्ठ साधकांनी विविध विषयांवर आपली विधाने केली. आज कोरोनाच्या काळात पाश्चिमात्य देशांनीही सनातन संस्कृतीच्या तुळशी, गौमाता आणि योगाचा आश्रय घेतला आहे.
यावेळी आश्रमाचे प्रसिद्ध प्रमुख तथा परहित चँरेटेबल स्ट्रसचे अध्यक्ष विशाल गुप्ता यांनी सांगितले की. सहभागी तरुणांना पंचस्करी साधना, सहिष्णुता, सेवा, आदर, दान, स्वार्थ त्याग, आणि समता हे गुण,मुलमंत्र सापडले आहेत.
कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून महाराष्ट्र राज्यातील ४०श्री योग वेदांत सेवा समिती व युवा सेवा संघाचे पदाधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. १५०० ते २००० साधकांनी उपस्थिती दर्शविली.यावेळी राजस्थान हून आलेले चन्नाराम कुमावत, राजेशभाई, ओमभाई, सतेंद्रभाई, बालसंस्कार केंद्राचे प्रभारी संजय अरोरा, कृषी प्रसादचे संचालक राम अशोशी आदी उपस्थित होते. यावेळी रायता आश्रमाचे संचालक रघुभाई यांनी सर्वाचे आभार मानले.







No comments:
Post a Comment