Sunday, 13 March 2022

शहापूर तालुक्यातील शेरे गावात भिषण पाणी टंचाई, ग्रामस्थांचा अंदोलनाचा इशारा, पाणी योजना खड्यात

शहापूर तालुक्यातील शेरे गावात भिषण पाणी टंचाई, ग्रामस्थांचा अंदोलनाचा इशारा, पाणी योजना खड्यात ?


कल्याण, (संजय कांबळे) : बारमाही वाहणारी भातसा नदी अगदी काही अंतरावर असताना देखील केवळ शासकीय आधिका-याची उदासीनता आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे शेरे गावातील बौद्ध वस्ती व आदिवासी वाडीत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून या विरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.


तसे पाहिले तर शहापूर तालुका हा भीषण पाणी टंचाईग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो, अनेक धरणे, नद्या तलाव, येथे आहेत. परंतु योग्य नियोजनाच्या भावामुळे 'नदी आमच्या उशाला, कोरड पडली घशाला'अशी अवस्था येथील आहे. मोठमोठ्या शहरांची तहान भागवणा-या येथील नदी धरणाच्या पाण्यासाठी येथील नागरिकांना मात्र पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे.


शहापूर तालुक्यातील शेरे गावातील बौद्धवस्ती व आदींवाशी वाडी येथे ५०/६० घरे आहेत, या लोकांसाठी ग्रामपंचायतीने पाण्याची लाईन टाकली आहे. परंतु ती नादुरुस्त आहे, दुसरी लाईन गटारातुन टाकण्यात आली आहे, तिला पाणी नाही.. वाड्यात तीन बोअरवेल आहेत, पण ती केव्हाच कोरडी पडली आहे. त्यामुळे वाडी वस्ती च्या जवळपास पाण्याची सोय नाही, महिलांना, लहान मुले, पुरुष यांना डोक्यावर किंवा सायकलने पाणी आणावे लागते आहे. सध्या या वाडीत पाण्याचा ठणठण गोपाळ आहे.


शासनाचा महत्वकांक्षी मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग याच वाड्या वस्ती च्या जवळून जातो आहे, यांच्या ब्लास्टिंग मध्ये अनेक गोरगरिबांच्या घरांना तडे गेले आहेत, याची नुकसान भरपाई म्हणून अगदीच तुंटपूज्या 'दिडक्यावर' यांची भोळवण केली आहे. मुंबई नागपूर अशी दोन मोठी शहरे या महामार्गाने जोडली गेल्याने परिसराचा विकास होईल अशी दिवास्वप्ने येथील लोकांना दाखविण्यात आली आहेत. परंतु पिण्याच्या पाण्यासारखी मुलभूत सोय होत नसल्याने सध्या हा परिसर 'भकास' झाला आहे.

येथील लोकप्रतिनिधी व निगरगट्ट शासकीय अधिकारी यांच्या उदासीनतेमुळे आमच्या वर पाणी टंचाईची वेळ आली आहे असे येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर पंडित यांचे म्हणने आहे, तर आमच्या वाडीतील पाणी टंचाई दूर न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे. यासंदर्भात, पाणीपुरवठा अधिका-यांनी फोन उचलला नाही तर, गटविकास अधिकारी यांना विचारले असता करतो, बघतो याशिवाय ते जास्त बोलू शकले नाही.

प्रतिक्रिया :-

आमच्या वाड्यात गेल्या कित्येक दिवसापासून पाणीटंचाई आहे, याबाबत ग्रामसेवकांना भेटून गंभीरता सांगितली पण त्यांनी दुर्लक्ष केले -माधुरी पंडित, गृहिणी, बौध्द वाडा (शेरे)

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...