Saturday, 19 March 2022

स्वधासंस्था कल्याण यांनी आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिराला भरघोस प्रतिसाद !!

स्वधासंस्था कल्याण यांनी आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिराला भरघोस प्रतिसाद !!


कल्याण, (संजय कांबळे) :

स्वधा संस्था ने १६ फेब्रुवारी २०२२ पासून रस्ता सुरक्षितता अभियान २०२२ ची सुरुवात केली. स्वामी नारायण हॉल कल्याण येथे कार्यशाळा आयोजित केले होते. या कार्यशाळेत पथनाट्य, कोविड योधांचे सत्कार व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केली गेली. याला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.


विविध समाज जागृतीचे उपक्रम राबविणारया स्वधा (सोशल अप्लीफटमेंट एंड डेव्हलपमेन्ट फॉर हेल्थ एक्शन) संस्थेच्या वतीने एकूण सात दिवस ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी अवजड वाहन चालकांसाठी नेत्र तपासणी शिबिर व मोफत चष्मा वाटप मोहीम यशस्वी रीत्या पार पाडली. स्वधासंस्था ने MORTH (रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय) यांच्या संयुक्त विद्यमाने पडघा टोल नाका येथे ३ दिवस, माणकोली नाका येथे २ दिवस व अंजूर फाटा येथे २ दिवस ही मोहीम राबवली. 

ही मोहीम २ मार्च २०२२ ते ९ मार्च २०२२ या तारखेस राबवली गेली. या शिबिरात एकूण  ७७६ अवजड वाहन चालकांचे डोळे तपासून, त्यातले  ६३३ वाहन चालकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. . मणिलाल शिंपी, कमांडर इन चीफ- RSP विभाग, ठाणे आणि सर्व वाहतूक पोलिसांचे सहकार्य मिळाले. शिबीर सुरळीत पार पाडण्यासाठी व अवजड वाहन चालकांना आणण्यासाठी त्यांचे सहकार्य मिळाले.

स्वधा संस्थाचे अध्यक्षा ईवा अथाविया यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सभासद मोनाली रॉय, टेसी फ्रेडी, कौशिक मुजुमदार, शिवाजी भोईर, छाया गरुड, मोहित ठाकोर, प्रितेश शेलार यांनी विशेष मेहनत घेतली

या शिबिरामुळे अनेक अवजड वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आणि असे शिबीर सर्वत्र आयोजित करावे असे सांगितले..

No comments:

Post a Comment

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !!

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !! कल्याण (टिटवाळा), संदीप शेंडगे : मांडा–टिटवाळा (पूर्व) येथील विद्यामंदिर शाळा...