कल्याण, डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होळीच्या सणाला चढला रंग !!
कल्याण, हेमंत रोकडे : दोन वर्षांपासून असलेल्या करोनाच्या संकटामुळे होळी, धुळवडीच्या सण साजरे करता नाही आले पण करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे यंदा हे दोन्ही दिवस जल्लोषात साजरे करण्यासाठी सर्वजण इच्छुक असून बाजारपेठाही पंधरा दिवस आधीपासून सजल्या आहेत. कल्याण, डोंबिवली येथील बाजारात विविध प्रकारच्या पिचकार्या, होळीचे, पूजेच्या सामानाची दुकाने, मिठाई ची दुकाने सज्ज झाली आहेत. होळीनिमित्त थंडाईला प्रामुख्याने विशेष मागणी असते. तसेच नागरिकांकडून नैसर्गिक रंगांना जास्त पसंती आहे, असे दिसते व बाजारात खास धुळवडीच्या दिवशी परिधान करण्यासाठी आकर्षक टीशर्ट, कुर्ते, मुलींचे टॉपही उपलब्ध झाले आहेत. यंदा बाजारात ड्रायफ्रूट केशर मिठाई, आमरस अशा थंडाई बाजारात उपलब्ध आहेत. तसेच होळीनिमित्त खास घेवर मलाई, गुजिया यांची मागणी मोठी असते. या वर्षी त्यांच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली असून होळीचा उत्सव साजरा होत आहे.

No comments:
Post a Comment