गोकुळ सेवा संस्था, तांबेडी ( गवळीवाडी ), ( रजि.) आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेला भरभरून प्रतिसाद !
मुंबई - ( दिपक कारकर ) :
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कोकणातील उपरोक्त संस्थेतर्फे रविवार दि. १३/३/२०२२ रोजी घाटकोपर येथे गोकुळ सेवा संस्था, तांबेडी (गवळवाडी) संचलित गोकुळ युवा क्रिकेट क्लब मुंबई आयोजित, शिवशाही चषक २०२२ पर्व ४ थे घाटकोपर येथे मोठ्या उत्साहात पार पडले. त्या क्रिकेट स्पर्धेला एकूण १६ संघांनी सहभाग घेऊन आपल्या खेळाचे प्रदर्शन केले.
या स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून सुनील वेंगुर्लेकर साहेब (लातूर ग्रामीण विधानसभा संपर्क प्रमुख), जीवन सावंत साहेब (निलंगा विधानसभा संपर्क प्रमुख), वकिल प्रदीप चोगले साहेब (भाजप युवा वॉर्ड अध्यक्ष), संदेश घाडीगावकर (कुडाळ तालुका संपर्क प्रमुख), श्री सुधीर सुर्वे साहेब (दत्त भक्त, समाजसेवक), राकेश जाधव, दीपक दादा कारकर (युवा पत्रकार), रवींद्र दादा वरंडेकर, श्री सिध्दीकेश वरंडेकर, अमित ब्रीद(खर विधानसभा समन्वयक), श्री निलेश गवळी (नाशिक विधानसभा युवा अध्यक्ष), उमेश माने साहेब (नगरसेवक प्रभाग क्र ११५), अविनाश कांबळे साहेब (विश्वस्त महाराष्ट्र यादव चेरिट ट्रस्ट), प्रकाश दुदम साहेब (संगमेश्वर तालुका उप संपर्क प्रमुख), सतीश नलावडे साहेब (उपविभाग प्रमुख धामापूर), जान्हवी ताई टक्के (समाजसेविका), कु. राज कदम (अभिनेता), विनोद महाडिक साहेब (विधानभवन कर्मचारी), सोहम दादा ब्रीद, रवींद्र दळवी साहेब, शाहीर तुषार पंदेरे, शाहीर संदीप सावंत, कवी गोपाळ करंडे, सत्कारमूर्ती, कु.श्रावणी सचिन खेडेकर (१० वी शालांत परीक्षेत ९९.०६%गुण प्राप्त), कु.सूरज सूर्यकांत जाधव (महाराष्ट्र टेनिसबॉल स्पर्धेत निवड).
या स्पर्धे मध्ये अ, गटामधून रवी ११ आणि ब, गटा मधून घाटला बॉईज चेंबूर, हे संघ अंतिम फेरीत दाखल झाले. अंतिम सामन्यात रवी ११ संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, घाटला बॉईज चेंबूर संघाने निर्धारित ५ षटकात ४४ धावा फलकावर लावल्या, विजयासाठी ४५ धावांचे लक्ष्य घेवून मैदानात उतरलेल्या रवी ११ या संघाने अवघ्या, ३ षटकच्या आतमध्ये हे आव्हान पार करून संघाला शिवशाही चषक मिळवून दिले. स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सूरज (रवी ११) या खेळाडूची निवड करण्यात आली. उत्कृष्ट गोलंदाज शुभम तर घटला बॉईजचा विस्फोटक फलंदाज लक्ष्मीकांत चव्हाण यांना उत्कृष्ट फलंदाज हा सन्मान देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील मालिकावीर म्हणून रवी ११ संघाचा रवी मात्रे याने किताब पटकावला,
विजेता संघ रवी ११ दिवा. उपविजेता तर घाटला बॉयेज चेंबूर विजेता ठरला.विजेत्या संघास रोख रक्कम ₹ २७,७७७/- व चषक, तसेच उपविजेता संघास रोख रक्कम ₹ १५,५५५/- व चषक, तसेच सर्व संघांना मंडळाकडून सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आले, सर्व मान्यवरांचे सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आले, तसेच या स्पर्धेसाठी लाभलेल्या देणगीदार याचे आभार मानण्यात आले, मंडळाचे ग्रामस्थ व कार्यकर्ते यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या भव्यदिव्य स्पर्धेतील आयोजनाचे अनेकांकडून अभिनंदनासह कौतुक होत आहे.



No comments:
Post a Comment