कॉम्रेड स. ना. भालेराव यांच्या चिकाटीच्या संघर्षाची सध्या गरज.. ! *प्राचार्य बी.एन .पाटील यांचे स. ना. भालेराव स्मृती शिवजागर मेळाव्यात प्रतिपादन*
चोपडा, बातमीदार.. येथे लालबावटा शेतमजूर युनियन व ग्रामपंचायत कर्मचारी महासंघातर्फे नगर वाचन मंदिरात आज रोजी दुपारी बारा वाजता भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे थोर नेते व स्वातंत्र्यसैनिक माजी आमदार माजी नगराध्यक्ष भूषवलेली भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे थोर आमदार नेते दिवंगत कॉम्रेड स. ना. भालेराव यांच्या २२व्या स्मृती दिना निमित्ताने शेतकरी शेतमजूर ग्रामपंचायत कर्मचारी भव्य शिवजागर मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यात मुख्य निमंत्रित वक्ते. प्राचार्य बी एन पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, का. भालेराव यांनी सन १९३५ ते २००० पर्यंतचा ६५ वर्षाचा काळ त्याग व संघर्षाचा राहिला. प्रथम देशाच्या स्वातंत्र्य साठी नंतर गोवा मुक्ती, संयुक्त महाराष्ट्र लढा पासून कामगार कष्टकरी जनतेसाठी शेकडो चळवळी त्यांनी केल्या त्यात गिरणी कामगार, नगरपालिका कामगारांपासून आदिवासी शेतमजूर ग्रामपंचायत कर्मचारी अशा तळागाळातील कर्मचाऱ्यांपर्यंत चळवळींचा समावेश होतो. हे प्रतिपादन करतांना आजही कॉम्रेड भालेरावांचा असा संघर्ष पुढे नेण्याची अत्यंत गरज आहे. असेही प्रतिपादन त्यांनी भाषणाच्या शेवटी केले.
या मेळाव्याचे अध्यक्ष स्थानी सेवानिवृत्त एसटी कामगार संघटनेचे नेते कॉम्रेड गजानन पोतदार हे होते. या मेळाव्यात सर्वप्रथम कॉम्रेड स. ना. भालेराव यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली नंतर कार्यक्रमाला सुरुवात कर्मचारी महासंघाचे तालुका अध्यक्ष रमेश दिगंबर पाटील रुखण खेडे स्वागत व प्रास्ताविक भाषण केले .
*एस टी कामगार यांची विलिनी करणं मागणी मूलभूत पण..*
मेळाव्याचे निमंत्रक ..कामगार नेते कॉ. अमृत महाजन यांनी मोदी सरकार बँक, विमा, रेल्वे, कोळसा, रस्ते, वीज क्षेत्रात खाजगीकरण आणून इंदिरा गांधी नेहरू सरकारने केलेल्या विलीनीकरण मुळावरच जबरदस्त घाव घालत आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील एसटी कामगार पगारवाढ दिली तरी एस टी चे विलीनीकरण मागणीवर अडून बसले आहेत. ही विलिनीकरणाची मागणी खरोखर मूलभूत आहे, परंतु केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे धोरण पाहता विलीनीकरण अशक्य आहे. तेव्हा सरकारने कर्मचाऱ्यांचा संप तडजोड करून मिटवावा व कष्टकरी जनतेची खाजगी वाहतुकी व्यवस्थेत होणारे हाल व लुबाडणूक थांबवावी असे आवाहन केले.
या मेळाव्यात काँ. बाळू लोहार, जिजाबाई रानेरजपूत, विश्वास पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्य समिती सदस्य महेंद्र धनगर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मेळाव्यात कामगारांच्या मागण्या जाहीर *१ मे कामगार दिना*पासून शेतकरी शेतमजूर कामगार संघर्षाचा बिगुल फुंकनार ! मागण्या अशा...
१) सध्याची पेट्रोल डिझेल तेल औषधी व इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई लक्षात घेता शेतकरी शेतमजुरांना दिले जाणारे मानधन तोकडे असून ते किमान तीन हजार रुपये करावे
2) सेवानिवृत्त एसटी कामगार व असंघटित कामगार यांना सात हजार रू पेन्शन द्यावे.
3) ५५वर्षे वरील सर्व शेतकरी शेतमजूर यांना राष्ट्रीय शेतकरी शेतमजुर पेन्शन कायदा करावा अन्नसुरक्षा व सामाजिक सुरक्षा लागू करा
4) घोडगावचे शेतमजूर यांची राहत्या घरांची जागा नावे करा.. अन्यथा १ मे २०२२ पासून जिल्हाभर आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला.
5) या मेळाव्यात *शिवाजी कोण होता?* हे गोविंद पानसरे लिखित जगातील २२ भाषांत प्रकाशित मराठी पुस्तकाच्या ५० प्रति दहा रुपये प्रमाणे वाटण्यात आल्या. मेळाव्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खजिनदार कॉम्रेड सुरेश सिंधी, शशिकला निंबाळकर देशमुख, गुपत्यार अरमान तडवी, रंजना महाजन, ताराबाई हेमाडे, अंबालाल राजपूत, बाळू कोळी, इरफान मण्यार, वासुदेव कोळी रवींद्र मराठे गणेश माळी, संतोष माळी, निंबा गवळी, जुबेदा पटेल, रायाबाई बारेला, शांताराम बाविस्कर, आत्माराम पाटील, कश्यपे, प्रमोद सूर्यवंशी सुधाकर धनगर, अशोक गायकवाड, श्रावण अढलके, जरीना बी रहिम, नजमा शेख, देविदास मराठे आदी २०० शेतकरी शेतमजूर आदिवासी, ग्रामपंचायत कर्मचारी कार्य करते पदाधिकारी यांचा समावेश होता. *ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची मेळाव्यानंतर स्वतंत्र बैठक घेऊन येत्या १० एप्रिल २२ रोजी कोल्हापूर माननीय ग्रामीण विकास मंत्री यांच्या घरावर संपर्क कार्यालयावर या आंदोलनासाठी जळगाव जिल्ह्यातून शंभर कर्मचारी जाणार असून त्यात चोपडा तालुक्यातून दहा कर्मचारी ९ एप्रिल ला जाण्याचा निर्णय घेण्यात आला*






No comments:
Post a Comment