Thursday, 10 March 2022

दोन सख्या भावांचे खून व तिसऱ्या सख्या भावास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न !! "आरोपीस दुहेरी जन्मठेप व १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा"

दोन सख्या भावांचे खून व तिसऱ्या सख्या भावास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न !! "आरोपीस दुहेरी जन्मठेप व १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा"


कल्याण, हेमंत रोकडे : महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन कल्याण हद्दीमध्ये दिनांक ०३/१२/२०१० रोजी रात्री २३:४५ वाजणेच्या सुमारास फिर्यादी  रामदास यशवंत देवकर, वय ४२ वर्षे, राह. रामदासवाडी त्यांचे भाऊ १) अशोक यशवंत देवकर वय ४० वर्षे, राह. रामदासवाडी २) कृष्णा यशवंत देवकर, वय ३२ वर्षे राह. रामदासवाडी असे रात्रीचे जेवण करून त्यांचे घराचे बाहेर गप्पा मारत बसले असतांना यातील आरोपी १) संजय नामदेव पाटील, वय ३८ वर्षे, राह. रामदासवाडी २) मनोज शंकर खांडगे, वय ३७ वर्षे, राह. रामदासवाडी असे स्प्लेंडर मो. सां.नं. एम. एच.०५ डब्ल्यु ९३५९ हिचे वरून येवून मागील झालेल्या भांडणाचा मनात राग धरून आरोपी -

* संजय नामदेव पाटील, वय ३८ वर्षे याने धारदार चाकुन फिर्यादी यांचा भाऊ १) अशोक यशवंत देवकर, वय ४० वर्षे, २) कृष्णा यशवंत देवकर, वय ३२ वर्षे यांचे गळयावर, छातीवर, पोटावर वार करून गंभीर दुखापती करून निर्घुण हत्या केली. आणि फिर्यादी श्री. रामदास यशवंत देवकर, वय ४२ वर्षे यांचे हातावर पोटावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणुन महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन, कल्याण येथे गुन्हा रजि. नं. ६३२/ २०१० भा.दं.वि. कलम ३०२, ३०७, ३२६, ५०६, ३४ प्रमाणे दिनांक ०४/१२/२०१० रोजी दाखल आहे.

सदर गुन्हयामध्ये दोन्ही आरोपी १) संजय नामदेव पाटील, वय ३८ वर्षे, २) मनोज शंकर खांडगे, वय ३७ वर्षे यांना दिनांक ०४/१२/२०१० रोजी अटक केली. तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री. एन के बानकर, पोलीस निरीक्षक श्री. आर. एम. आव्हाड यांनी गुन्हयाचा तपास करून आरोपी विरुद्ध सबळ व भक्कम पुराव्याअंती मा. सत्र न्यायालय कल्याण येथे दोषारोप पत्र दाखल केले. सदर गुन्हयाची मा. न्यायालयात सुनावणी चालु असताना दरम्यानचे कालावधीत आरोपी २) मनोज शंकर खांडगे, वय ३७ वर्षे हा मयत झालेला आहे.

सदर गुन्हयाची सुनावणी चालु असताना न्यायालयाने फिर्यादी, पंच, साक्षीदार यांच्या साक्षी नोंदवुन परिस्थीतीजन्य पुरावा व वस्तुस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरोपी नामे संजय नामदेव पाटील याला दोन्ही भावांचे खुनाचे आरोपाखाली व फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला या आरोपाखाली भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, ३०७ अंतर्गत दंडनीय गुन्हयासाठी फौजदारी प्रक्रीया संहिता कलम २३५ (२) नुसार दोषी ठरवण्यात आले असून खालील प्रमाणे शिक्षा सुनावली आहे.

* अशोक यशवंत देवकर, वय ४० वर्षे, याचे खुनासाठी जन्मठेपेची सश्रम कारावासाची शिक्षा व २०,००० /- रू. (वीस हजार रूपये) दंड, दंड न भरल्यास ६ महीने सश्रम कारावास भोगावा लागेल.

* कृष्णा यशवंत देवकर, वय ३२ वर्षे याचे खुनासाठी जन्मठेपेची सश्रम कारावासाची शिक्षा व २०,०००/- रू. (वीस हजार रूपये) दंड, दंड न भरल्यास ६ महीने सश्रम कारावास भोगावा लागेल.

* फिर्यादी श्री. रामदास यशवंत देवकर वय ४२ वर्षे यांचा हत्येचा प्रयत्न केलेप्रकरणी भा.द. वि.कलम ३०७ अन्वये १० वर्षे सश्रम कारावास व १०,००० / रू. दंड, दंड न भरल्यास ६ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सर्व मुलभुत शिक्षा एकाच वेळी भोगाव्या लागतील आणि आरोपी कारावासाच्या कालावधीत कोणत्याही माफीसाठी पात्र राहणार नाही असा निकाल जिल्हा न्यायाधीश आर.पी.पांडे, (DJ-1 कल्याण) यांनी निर्णय दिलेला आहे.

सदर केसमध्ये सरकारी अभियोक्ता अश्वीनी भामरे पाटील यांनी युक्तीवाद केलेला असुन मा. अपर पोलीस आयुक्त सो पुर्व प्रादेशिक विभाग श्री दत्तात्रय कराळे, मा. पोलीस उप आयुक्त सो परिमंडळ-३ कल्याण सचिन गुंजाळ, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त सो, कल्याण विभाग उमेश माने-पाटील यांच्या वेळोवेळी मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप पाटील यांनी गुन्हयातील साक्षीदार यांना मा. न्यायालयात साक्ष देणेकामी वेळोवेळी ब्रिफिंग केले आहे. कोर्ट पैरवी अंमलदार म्हणुन पो.ना. / ५३८२ दिपक पिंगट, पो.ना. / ६९५० शशीकांत गांगुर्डे यांनी कामकाज केले आहे.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...