Thursday, 10 March 2022

ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त कडोंमपा पत्रकार कक्षात प्रतिमा पुजन. !!

ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त कडोंमपा पत्रकार कक्षात प्रतिमा पुजन. !!


कल्याण, (सागर शिंदे) - ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचा १२५ वा स्मृतिदिन कल्याण डोंबिवली महानगरपालिका पत्रकार कक्षात पत्रकारांनी ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन साजरा केला. 


सावित्रीमाईंच्या प्रतिमेस महिला पत्रकारांनी प्रथम पुष्पहार अर्पण केला व दिप प्रज्वलित करुन त्यांना अभिवादन केले. उपस्थित पत्रकारांनी ज्ञानज्योतींच्या प्रतिमेस पुष्प वाहून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. 


सदर छोटेखानी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक कांबळे यांनी केले. याप्रसंगी स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय निरीक्षक अण्णासाहेब पंडीत यांचे सह जेष्ठ पत्रकार बाळकृष्ण मोरे, राजु काऊतकर, सुरेश काटे, कुणाल म्हात्रे, प्रदिप गुप्ता आणि पत्रकार कक्षेतील इतर मान्यवर पत्रकार मंडळी उपस्थित होती.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...