Wednesday, 23 March 2022

पुरग्रस्तांना मिळालेल्या मदतीतूनही 'लाच' मागणाऱ्या शहाड तलाठी व तिचा खाजगी इसम जाळ्यात !संतापजनक प्रकार ?

पुरग्रस्तांना मिळालेल्या मदतीतूनही 'लाच' मागणाऱ्या शहाड तलाठी व तिचा खाजगी इसम जाळ्यात !संतापजनक प्रकार ?


कल्याण, (संजय कांबळे) : मृत्यूच्या टाळूवरील लोणी खाणारे, असे शब्द ब-याच वेळा आपल्या काणावर पडतात, नेमका असाच काहीसा प्रकार कल्याण तहसीलदार कार्यालयार्तगत येत असलेल्या शहाड तलाठी व त्यांच्या खाजगी इसमाकडून घडला आहे, पुरग्रस्तांना मिळालेल्या मदतीतूनही "लाच" मागणाऱ्या या ना-लायक तलाठी व त्याच्या लिपिकाला लाचलुचपत विभागाने सापळ्यात अडकवले आहे. या प्रकारामुळे संपूर्ण कल्याण तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की मागील काही वर्षापासून कल्याण तालुका हा पुरग्रस्तांचा तालुका आहे की काय?अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पाऊस व उल्हास,भातसा, काळू आणि बारवी नदीस आलेल्या पुरामुळे तालुक्यातील म्हारळ, वरप, कांबा, रायते, खडवली आदी गावाना भयंकर फटका बसला होता. शेती, घरे, दुकाने, जनावरे यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. अनेकांचे संसार उध्वस्त झाले होते. यावेळी यांना मदत मिळावी म्हणून शासनाने काही प्रमाणात शासकीय मदत जाहीर केली होती. त्याचे काही प्रमाणात वाटप झाले होते तर काही सुरु होते.


असेच कांबा गावातील काही दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, याचे रितसर नुकसान पंचनामे देखील झाले होते. यांना प्रत्येकी ४९ हजार रुपये नुकसान भरपाई आली होती. त्याचे वाटप कल्याण तहसीलदार कार्यालया अंतर्गत तलाठी आँफिस शहाड येथून सुरू होते. परंतु ऐवढी शासकीय मदत तीही शेतकऱ्यांना मिळते म्हटल्यावर तलाठी श्रीमती अमृता बडगुजर व तिचा खाजगी लिपिक अनंता भास्कर कंटे यांचे डोळे फिरले, यातून प्रत्येक नुकसा नीचे चेक देण्यात १५/२० हजार रुपये द्यावे लागतील, नाही दिले तर चेक मिळणार नाही, असा दमच कांबा गावचे पुरग्रस्त उत्तर सुरोशे यांना दिला. यातूनही ते थोडेफार द्यायला तयार झाले, परंतु आम्हाला ६० हजार रुपये रोख रक्कम द्या, असे सांगितल्याने ते संतापले, मँडम आमचे हे पुराचे पैसे आहेत, जमिनीच्या व्यवहाराचे नाहीत, अशी विनंती करून ही न ऐकल्यावर सुरोशे यांनी तडक लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. यांनी तक्रारीची खातरजमा करून शहाड तलाठी कार्यालयात दुपारी १२ वाजता अनंता कटे याला रंगेहाथ पैसे स्विकारताना पकडले, यावेळी त्याच्या बँगेत दिड ते दोन लाख रुपये रोख रक्कम सापडली. शेजारी तलाठी अमृता बडगुजर उपस्थित होत्या. यावेळी हे पैसे वरपर्यंत द्यायचे आहे. असे कंटे सांगत होता, त्यामुळे ते नक्की क्लार्क, मंडल अधिकारी, निवासी नायब तहसीलदार की तहसीलदार का त्यांच्या पेक्षा अजूनही वर? हे तपासात निष्पन्न होईल.


दरम्यान तालुक्यातील अनेक गावात या मदतीचे वाटप सुरू आहे, त्यामुळे इतरांचे काय? त्यांना किती मिळत असतील याचा विचार कोण करणार.

तथापि या अगोदर आमच्या गावातील एका व्यक्ती चा ७/१२ नोंद करण्यासाठी ३५ हजार रूपये घेतल्याचे एका व्यक्तीने सांगितले. त्यामुळे कल्याण तहसीलदार कार्यालय 'महसूल, कार्यालय नसून 'वसूली' कार्यालय झाल्याचे दिसून येते. यामुळे गोरगरीब, शेतकरी, पुरग्रस्त यांच्या टाळू वरचे लोणी खाणा-या अशा अधिकारी व कर्मचारी यांना असा धडा शिकवायला पाहिजे असे अनेकांचे म्हणने आहे. तर पुरग्रस्ता सारख्या आस्मानी नैसर्गिक आपत्ती च्या मदतीत ही लाच मागणाऱ्या या तलाठी व कर्मचारी विरोधात तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.

 

No comments:

Post a Comment

भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायतिच्या नावावर असलेल्या गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्यास ग्रामपंचायत अपयशी, संशयाला ऊत! !!

भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायतिच्या नावावर असलेल्या गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्यास ग्रामपंचायत अपयशी, संशयाला ऊत! !! ...