कल्याण शहर पश्चिम मधील प्रभारी शिवसेना कार्यकारिणी जाहीर !! "कडोमपा निवडणूकची पार्श्वभूमी"
कल्याण, हेमंत रोकडे : येऊ घातलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिका-यांच्या कामाचा आढावा घेऊन प्रभारी नेमणूका करण्यात आल्या. मुख्यमंत्री-शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने (मार्गदर्शनाखाली) या नियुक्त्या कायम करण्यात येतील. असे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे कळवण्यात आले.
नेमणुका :-
प्रभारी विधानसभा संघटक : रवींद्र कपोते (कल्याण शहर पश्चिम विभाग), अरविंद मोरे (कल्याण शहर पश्चिम विभाग), संजय पाटील (कल्याण शहर पश्चिम विभाग), प्रभुनाथ भोईर (कल्याण शहर पश्चिम विभाग), किशोर शुक्ला (शहाड, मोहना, टिटवाळा विभाग), विजय काटकर (मनपा प्रभाग समिती अ विभाग), सुनील वायले (मनपा प्रभाग समिती ब विभाग), सचिन बासरे (मनपा प्रभाग समिती क विभाग).
प्रभारी विधानसभा सहसंघटक : प्रफुल्लशेठ गवळी (कल्याण शहर पश्चिम विभाग), मारुती नागरे (कल्याण शहर पश्चिम विभाग), दिलीप पातकर (कल्याण शहर पश्चिम विभाग), दशरथ तरे (कल्याण शहर पश्चिम विभाग), नितीन माने (कल्याण शहर पश्चिम विभाग).
प्रभारी उपशहरप्रमुख : श्रीधर किसमतराव (अ प्रभाग क्षेत्र वॉर्ड 8 ते 11), सुरेश सोनार (अ प्रभाग क्षेत्र वॉर्ड 6, 7, 12 ते 15), वंडार कारभारी (ब प्रभाग क्षेत्र वॉर्ड 1, 2, 4, 5), प्रशांत पाटील (ब प्रभाग क्षेत्र वॉर्ड 3, 16 ते 20), विद्याधर भोईर (ब प्रभाग क्षेत्र वॉर्ड 3, 16 ते 20), रवींद्र पाटील (ब प्रभाग क्षेत्र वॉर्ड 24 ते 27, 30, 37, 38), अरविंद पोटे (क प्रभाग क्षेत्र वॉर्ड 21, 22, 23, 28, 29), दिनेश शेटय़े (क प्रभाग क्षेत्र वॉर्ड 31, 32, 33), विलास भोईर (क प्रभाग क्षेत्र वॉर्ड 34, 35, 36).
प्रभारी उपशहर संघटक : सुरेश पाटील, अनिल गोवळकर, सुभाष जगताप, विलास जैन, राजू दीक्षित, अरुण चव्हाण, दत्ता खंडागळे.
प्रभारी विभागप्रमुख : ऍड. जयेश वाणी (वॉर्ड क्र. 8 ते 11), अंकुश जोगदंड (वॉर्ड क्र. 12 ते 14), दुर्योधन पाटील (वॉर्ड क्र. 6, 7, 15), विश्वनाथ जाधव (वॉर्ड क्र. 17, 18), सतीश वायचळ (वॉर्ड क्र. 4, 5, 16), रामदास कारभारी (वॉर्ड क्र. 1, 2), प्रशांत भामरे (वॉर्ड क्र. 3, 19, 20), प्रसन्ना कापसे (वॉर्ड क्र. 28, 29), मोहन उगले (वॉर्ड क्र. 21 ते 23), राजेश महाले (वॉर्ड क्र. 31 ते 33), कृष्णा परब (वॉर्ड क्र. 24, 25, 27), भागवत बैसाने (वॉर्ड क्र. 26, 30, 37, 38), अविनाश जगताप (वॉर्ड क्र. 34 ते 36).

No comments:
Post a Comment