वन्य प्राण्यांपासून पिकांच्या नासाडीमुळे त्रस्त शेतकऱ्यांची विखरन येथे १३ मार्च रविवारी !!
एरंडोल, बातमीदार : एरंडोल तालुक्यातील विखरन येथे.. माळी समाज मंगल कार्यालय मध्ये १३/३/२२ रविवार रोजी सकाळी ९ वाजता वन्य प्राण्यांपासून पिकांच्या नासाडीमुळे त्रस्त शेतकऱ्यांची भव्यपरिषद घेण्यात आली आहे. या परिषदेचे अध्यक्ष स्थानी.. श्री जयंत हिरामण महाजन, अध्यक्ष क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ विखरण हे राहणार असून मेळाव्याचे स्वागताध्यक्ष कॉ. हिम्मतराव विश्राम महाजन संस्थापक सचिव, संत सावता माळी वाचनालय विखरन हे आहेत. परिषदेचे मुख्य मार्गदर्शक म्हणून शिरपूर येथील *महाराष्ट्र राज्य किसान सभाचे सचिव ॲड. हिरालाल परदेशी, भा क प जिल्हा सचिव, कॉ. लक्ष्मण शिंदे, कामगार नेते कॉ. अमृत महाजन (चोपडा)*
भा क प राज्य कौन्सिल सदस्य हे उपस्थित राहणार आहेत, तरी शेतकऱ्यांनी वेळेवर हजर राहावे असे आवाहन असे परिषदेचे निमंत्रक भा क प तालुका सचिव संजय बागड (पत्रकार), गोपाल पाटील आदर्श शेतकरी, बापू पाटील, पुरुषोत्तम महाजन आदर्श शेतकरी, रोहिदास मिस्तरी, गंभीर महाजन, सुभाष महाजन, दिलीप चौधरी, अनिल महाजन, डॉ. राजेंद्र देसले, उत्तम महाजन, खर्ची साहेबराव पाटील, खडके, भावराव हटकर, माधवराव हटकर, वसंत भील, पुंडलिक पाटील चोरटकी यांनी केले आहे.
****** *भव्यपरिषद *******

No comments:
Post a Comment