Friday, 11 March 2022

डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रेमाचे चाळे करणाऱ्या प्रेमी युगलावर गुन्हा दाखल !!

डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रेमाचे चाळे करणाऱ्या प्रेमी युगलावर गुन्हा दाखल !!


भिवंडी, दिं,११, अरुण पाटील (कोपर) : डोंबिवली शहर हे सुसंस्कृत, सुशिक्षितांची सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जात असून सद्या डोंबिवली रेल्वे स्थानकावर खुल्लमखुल्ला प्रेमाचे चाळे करणाऱ्या एका प्रेमियुगलाचा एक व्हिडिओ वायरल झाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला असून हे चाळे करणाऱ्या " त्या " तरूण-तरूणीचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. 

कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करणे हा कायाद्याने गुन्हा असून असे वर्तन करणाऱ्या " त्या " प्रेमीयुगलावर डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस " त्या " प्रेमियुगलाचा शोध घेत आहेत. या कृत्यामुळे विविध संघटनानी त्या विरोधात निषेध व्यक्त करून यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केल्याचे बोलले जात आहे. 

सोमवारी (दि.७) दुपारी डोंबिवलीच्या रेल्वे स्थानकावर थांबलेल्या प्रेमीयुगुलांना कसलेच भान राहिले नव्हते. सार्वजनिक ठिकाणी त्यांना तरूण-तरूणीचा रोमान्स पाहून ये-जा करणाऱ्या आणि तेथे थांबलेल्या प्रवाशांच्याही भुवया उंचावल्या. 

डोंबिवली रेल्वे स्थानकावर काही दिवसापूर्वी तरुण-तरुणीचे अश्लील चाळे सुरु होते. बराच वेळ होऊनही चाळे काही संपत नसल्याने त्यामुळे संतापलेल्या एका प्रवाशाने हा रोमान्स आपल्या मोबाईलमधील कॅमेरात कैद तर केलाच. शिवाय हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. वाढत्या गुन्हेगारीमुळे बदनाम झालेल्या डोंबिवलीत आता असलेही प्रकार खुल्लम-खुल्ला होत असल्याने एकीकडे डोंबिवलीकरांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...