Saturday, 19 March 2022

सा. कल्याण नागरिकचे मालक, मुद्रक, प्रकाशक सौ. प्राजक्ता मच्छिन्द्र कांबळे यांचे निधन !!

सा. कल्याण नागरिकचे मालक, मुद्रक, प्रकाशक सौ. प्राजक्ता मच्छिन्द्र कांबळे यांचे निधन !!


कल्याण, दि. १८/३/२०२२ :
         कल्याण येथील समर्थ ऍडव्हर्टायझर्सचे संचालक व सा.कल्याण नागरिक चे संपादक मच्छिंद्र युवराज कांबळे यांच्या पत्नी सौ. प्राजक्ता कांबळे यांचे दिनांक १७ मार्च २०२२ रोजी रात्री ११.३० वा. अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.  
          मच्छिंद्र कांबळे हे गेल्या वीस वर्षापासून कल्याणमध्ये वृत्तपत्र जाहिरातीचे काम करीत आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कांबळे यांनी जाहिरात क्षेत्रात मोठे यश संपादन केले. या त्यांच्या यशात त्यांची पत्नी प्राजक्ता यांचा मोठा सिंहाचा वाटा होता. प्राजक्ता कांबळे ह्या साप्ताहिक कल्याण नागरिकचे मालक,मुद्रक आणि प्रकाशकही होते. त्या सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असायच्या. प्रत्येक कार्यक्रमात त्या हिरीरीने भाग घेत असत. प्राजक्ता यांच्या जाण्याने कांबळे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
        दहाव्याचा कार्यक्रम शनिवार दि.२६/३/२०२२ रोजी सकाळी १० वा. काळा तलाव, कल्याण येथे व  तेराव्याचा कार्यक्रम मंगळवार दि. २९/३/२०२२ रोजी राजयोग हौसिंग सोसायटी, बेतूरकर पाडा, कल्याण (प.) येथे आहे.
       त्यांच्या पश्‍चात पती मच्छिंद्र कांबळे, आणि दोन मुले प्रथमेश, राज असा परिवार आहे.
        सर्व स्तरातून सौ. प्राजक्ता मच्छिन्द्र कांबळे यांनी श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

1 comment:

  1. अत्यंत दुःखद घटना घडली आहे.
    वहिनींना भावपूर्ण आदरांजली

    ReplyDelete

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !!

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !! कल्याण (टिटवाळा), संदीप शेंडगे : मांडा–टिटवाळा (पूर्व) येथील विद्यामंदिर शाळा...