Saturday, 5 March 2022

महाबळेश्वर व परिसरात २१ मार्च पासून रात्रीच्या जंगल सफारीचे आयोजन !!

महाबळेश्वर व परिसरात २१ मार्च पासून रात्रीच्या जंगल सफारीचे आयोजन !!


भिवंडी, दिं,५, अरुण पाटील (कोपर) :
             महाबळेश्‍वर, पाचगणी, ठोसेधर, कोयनानगर, जावळी, पाटण तालुक्यातील वन विभागाची हद्द विकसित केल्यास पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात २१ मार्चपासून कास पठार, महाबळेश्‍वर आणि कोयनानगर या परिसरात रात्रीच्या जंगल सफारीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिली.
              मोहिते म्हणाले की, ताडोबा जंगल सफारीच्या धर्तीवर सातार्‍यातही जंगल सफारी आयोजित करता येईल. या सफरीत सुरक्षितपणे नियम पाळून वन्यजीवाचा अभ्यास करणे, पाणवठा विकासाचे नियम निश्‍चित करणे, दुर्मिळ वनौषधी, प्राणीपक्ष्याची माहिती देणारे स्लाईड शोज, असे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तसेच उन्हाळ्यात वन विभागाच्या हद्दीतील ७०० पाणवठे विकसित करण्यात येणार आहे. जंगलात पहिल्या टप्प्यात तीनशे आणि दुसर्‍या टप्प्यात चारशे पाणवठे विकसित करण्यात येणार आहेत.
               देवरायांचा विकास, पाण्याची उपलब्धता आणि दुर्मिळ जलस्त्रोत शोधून त्यांचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली असून रात्रीच्या जंगल सफारीची तयारी सुरु आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी वन विभागशी संपर्क साघावा, असे आवाहन महादेव मोहिते यांनी केले.

No comments:

Post a Comment

रविवारी ठाण्यात रंगणार नाट्यजल्लोष !!

रविवारी ठाण्यात रंगणार नाट्यजल्लोष !! ठाणे, दि. १८, दिवंगत श्रेष्ठ नाटककार रत्नाकर मतकरींच्या संकल्पनेतून साकार झालेल्या वंचितां...