Friday, 4 March 2022

सार्वजनिक बांधकाम विभाग कल्याण येथे माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली !!

सार्वजनिक बांधकाम विभाग कल्याण येथे माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली !!


कल्याण, प्रतिनिधि : कल्याण सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग क्र. १, येथे जनमाहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी ही पदे स्वयंघोषित (बोगस) असून  माहिती अधिकार कायद्याची निव्वळ पायमल्ली सुरू आहे. पी. बी कुंभार यांनी मागवलेल्या माहिती मधुन ही गंभीर बाब ऊघड झाली आहे. तसेच गेल्या दोन वर्षांपासून सां.बा. उपविभाग क्रमांक १ येथे झालेल्या सर्वच प्रथम माहिती अधिकार अपिलीय सुनावण्या बोगस असल्याचे निदर्शनास आले आहे.

पी.बी. कुंभार यांनी दि. १७/०१/२०२२ रोजी माहिती अधिकाराच्या अंतर्गत खालील माहिती मागितली होती - "माहितीअधिकार अधिनियम २००५ अन्वये संपूर्ण कलम ५ अंतर्गत आपल्या कार्यालयाचे कार्यवाहीचे आदेश मिळणे बाबत पुढील संदर्भात माहिती संदर्भ १) सां.बा. उपविभाग क्रमांक १ कल्याण येथे एकुण कीती जनमाहिती अधिकारी कोणाच्या आदेशानुसार नियुक्त केले त्या संदर्भातील आदेश पत्र. संदर्भ २) ज्यांच्या आदेशाने प्रथम अपिलीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली ते आदेशपत्र/ नेमणूक पत्र, सोबत नेमणूकी संदर्भातील आयोगाचे नेमणूक पत्र. "
वरील महीती अधिकार अर्जाला ३० दिवसांत उत्तर न मिळाल्याने पी.बी कुंभार यांनी अपील दाखल केले असता, अपिलीय सुनावणी दरम्यान संबंधित कार्यालयाने जी माहिती दिली त्या नूसार, हे सर्वच स्वयंघोषित जन माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी असल्याचे निदर्शनास आले आहे.


जनमाहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांची नेमणूक माहीती आयोगाच्या आदेशानुसार केली जाते, परंतू संबंधित सां.बा. उपविभाग क्रमांक १ येथे पदासिन अपिलीय अधिकारी व जनमाहिती अधिकारी हे स्वयंघोषित असून आयोगाकडून यांना कोणत्याही प्रकारे नियुक्ती पत्र देण्यात आलेले नाही.


उप विभागीय अभियंता श्रीमती. मोहरीर यांनी स्वत:चीच नियुक्ती अपिलीय अधिकारी म्हणून केल्याचे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार उघड झाले आहे. माहीती अधिनियम यांचा अभ्यास नसणे व अपिलीय अधिकारी यांचे पत्रावर क्लार्क ने सही करणे, तसेच प्रथम माहिती अधिकार अर्जाला जनमाहिती अधिकाऱ्याऐवजी अपिलीय अधिकारी यांनी उत्तर देणे, एवढेच नाहीतर उत्तरा दाखलची पत्रे जाणिवपूर्वक बॅकडेटेड करून उशिरा माहीतीअधिकार कार्यकर्त्यांना पाठवणे, जेणेकरून अपिल दाखल करण्याची तारीख उलटून जावी, असे गैर प्रकार कल्याण सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग क्रमांक १ येथे सूरू आहेत.

संबंधित गैर प्रकाराची दप्तर दिरंगाई तसेच अभिलेख व्यवस्थापन कायद्या अंतर्गत रीतसर तक्रार सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ ठाणे याच्या कडे करू देखील संबंधित गैर प्रकारावर जाणिवपूर्वक पांघरूण टाकले जात आहे. 

मागील उपविभाग अभियंता एम.व्ही. चव्हाण व सध्या पदासीन असलेल्या  उपविभाग अभियंता या श्रीमती एस. आर. मोहरीर  यांनी स्वत:च्याच नेमणुका स्वत: केल्याचे निदर्शनास आले आहे.

आजवर कल्याण येथील सर्वच माहिती अधिकार कार्यकर्ते व पत्रकार यांच्या बोगस अपिलीय सुनावण्या करून आजवर अनेक प्रकरणे रीतसर दाबण्याचा प्रयत्न झालेला आहे.

No comments:

Post a Comment

कोकणचे सुपुत्र रुपेश कोलते"कोकण रत्न- २०२५ मानद पदवी पुरस्काराने सन्मानित !!

कोकणचे सुपुत्र रुपेश कोलते"कोकण रत्न- २०२५ मानद पदवी पुरस्काराने सन्मानित !! मुंबई,  (शांताराम गुडेकर) :           ...