Thursday, 24 March 2022

कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मृतीदिनी महानगरपालिकेतर्फे भावपूर्ण आदरांजली !

कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मृतीदिनी महानगरपालिकेतर्फे भावपूर्ण आदरांजली !


कल्याण, हेमंत रोकडे : कल्याण डोंबिवली परिसरातील डोंबिवली शहरात राहणारे शूरवीर कॅ.विनयकुमार सचान यांना मातृभूमीच्या रक्षणासाठी काश्मीर मध्ये दहशतवाद्यांशी लढताना २४ मार्च २००३ रोजी वीरमरण आले. 


त्यामुळे २४ मार्च या दिवशी कॅ.विनयकुमार सचान यांचे स्मृतीप्रित्यर्थ महापालिकेतर्फे डोंबिवली येथील  वै.ह.भ.प. श्री.सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडा संकुलातील त्यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात येते. 


आजही कॅ. विनय कुमार सचान यांच्या स्मृतीदिनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी, त्‍यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली. यावेळी उपस्थित कॅ. विनयकुमार सचान यांचे माता-पिता, बहिण तसेच महापालिकेच्या विभागीय उपायुक्त पल्लवी भागवत, महापालिका सचिव संजय जाधव, कार्यकारी अभियंता विजय पाटील, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सहा.आयुक्त राजेश सावंत, उप अभियंता शैलेश मळेकर यांनी देखील कॅ.विनयकुमार सचान यांच्या स्मारकास पुष्पसुमने अर्पण करून आदरांजली वाहिली. यासमयी इतर अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच कॅ. विनयकुमार सचान यांचे नातेवाईक व नागरिक उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

शाहीर जयंत चव्हाण (बापू) कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !!

शाहीर जयंत चव्हाण (बापू)  कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !! मुंबई (शांताराम गुडेकर)               बालपणापासून गायन व...