Thursday, 24 March 2022

उल्हासनगर मध्ये वाहतूक पोलिसाला धक्का बुक्की व वार्डनला शिवीगाळ केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल !!

उल्हासनगर मध्ये वाहतूक पोलिसाला धक्का बुक्की  व वार्डनला शिवीगाळ केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल !!


भिवंडी, दिं,२४, अरुण पाटील (कोपर) :
           उल्हासनगर येथे नेहरू चौकात बुधवारी दुपारी अडीज वाजता वाहतूक नियमांचे कर्तव्य करणारे पोलीस हवालदार आकाश चव्हाण व वाहतूक वार्डनला शिवीगाळ व मारहाण केल्या प्रकरणी राजेश कटारिया याच्यावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
              उल्हासनगर कॅम्प नं-३ नेहरू चौकात वाहतूक पोलीस हवालदार आकाश चव्हाण हे बुधवारी अडीज वाजता वाहतूक नियमांचे कर्तव्य बजावत होते. त्यावेळी राजेश कटारिया नावाचा इसम जोराजोरात ओरडत सरबतवाल्याला घेऊन त्यांच्याकडे आला. त्यावेळी चव्हाण यांनी मोठ्याने ओरडू नको, शांत राहून झालेला प्रकार सांग, असे बोलले. सरबतवाला ५ रुपयांचा बर्फ देत नसल्याचे सांगून पुन्हा ओरडू लागला.
              पुन्हा चव्हाण यांनी ओरडू नको असे बजाविले. याचा राग कटारिया याला येऊन त्याने हवालदार चव्हाण यांना शिवीगाळ करून शर्ट पकडून धक्काबुक्की केली. यावेळी उपस्थित असलेला वाहतूक वार्डन निलेश बडगुजर यालाही शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात कटारिया याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

No comments:

Post a Comment

शाहीर जयंत चव्हाण (बापू) कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !!

शाहीर जयंत चव्हाण (बापू)  कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !! मुंबई (शांताराम गुडेकर)               बालपणापासून गायन व...