Monday, 7 March 2022

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास मुदतवाढ, ३१ मार्चपर्यंत मुदत !! * अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन * मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहील्यास प्राचार्य जबाबदार राहणार*

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास मुदतवाढ, ३१ मार्चपर्यंत मुदत !!
* अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन
* मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहील्यास प्राचार्य जबाबदार राहणार*


मुंबई, बातमीदार : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तसेच बहुजन कल्याण इतर मागास विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागासप्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण फी, परिक्षा फी या योजनांचा लाभ देण्यात येतो. 

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यास विभागाच्या https:// mahadht.mahit.gov.in या पोर्टलवरुन ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. सदर प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा 14 फेब्रुवारी पासुन उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदणी मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाले आहे. सामाजिक न्याय विभाग, बहुजन कल्याण विभागामार्फत मंजूर करण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांना दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज करण्याची सूचना महाविद्यालयांनी द्यावी. विद्यार्थ्यांनी मुदतीत अर्ज न भरल्यास विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येणार नाही. मागील वर्षीच्या तुलनेत नोंदणी १०० टक्के करण्यात यावी. 

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ७ मार्च तर, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या महविद्यालयातील मागासवर्गीय विदयार्थी अर्ज भरण्यापासुन वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी प्राचार्य यांची राहील याची नोंद घ्यावी. तरी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

पत्रकार पंकजकुमार पाटील यांना 'समाजभूषण' आणि निर्भीड जागल्या हे दोन पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान !!

पत्रकार पंकजकुमार पाटील यांना 'समाजभूषण' आणि निर्भीड जागल्या हे दोन पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान !! मुंबई, प्रतिनिधी : द...