Tuesday, 8 March 2022

महिला दिनानिमित्त आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार !! बदलापूर मध्ये "महिला तक्रार निवारण केंद्र" पुन्हा सुरू करण्याची भाजपा युवा मोर्चा अध्यक्षा *कु. ज्योती जवळेकर* यांची मागणी.

महिला दिनानिमित्त आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार !!

बदलापूर मध्ये "महिला तक्रार निवारण केंद्र" पुन्हा सुरू करण्याची भाजपा युवा मोर्चा अध्यक्षा *कु. ज्योती जवळेकर* यांची मागणी. 


बदलापूर, (अण्णा पंडीत) - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून *भारतीय जनता युवा मोर्चा, बदलापुरच्या युवती विभागाच्या युवती अध्यक्षा कु. ज्योती जवळेकर* ह्यांच्या अध्यक्षतेखाली बदलापुर मधील अश्विनी हॉस्पिटल येथील *डॉ.जितेंद्र वड्डीकर* यांच्या उपस्थितीत सर्व महिला कर्मचाऱ्यांस गुलाब पुष्प देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. सदर सर्व कर्मचारी वर्गाची विचारपूस करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि सातत्याने व अविरतपणे करत असलेल्या आरोग्य सेवेबद्दल बद्दल त्यांचे कौतुक करुन आभार मानले. सदर समयी सर्व महिला कर्मचारी वर्ग करण्यात आलेल्या सत्कारामुळे भावूक झाला होता.


तसेच भारतीय जनता युवा मोर्चा, बदलापुरच्या युवती विभागाच्या युवती अध्यक्षा *कु. ज्योती जवळेकर* ह्यांच्या नेतृत्वाखाली बदलापुर मधील बंद पडलेले परंतु आवश्यक असलेले *महिला तक्रार निवारण कक्ष* पुन्हा चालू करण्याबाबत बदलापूर पुर्व पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले. सदर मागणीची दखल घेण्याबाबत वरिष्ठांना अहवाल सादर करण्याचे आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून देण्यात आले.

याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा, बदलापुरच्या युवती विभागाच्या युवती अध्यक्षा *कु. ज्योती जवळेकर, कु. श्रद्धा राऊत, कु. पूनम राम, वर्षा सोळंके* व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

2 comments:

  1. always good work by BJYM
    Keep it up👍👍
    And proud of you jyoti javalekar madam & whole team..

    ReplyDelete

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...