Tuesday, 8 March 2022

जागतिक महिला दिनानिमित्त माता भगीनिंना साडी व खाऊचे वाटप भटके विमुक्त सामाजिक संस्थेचा अनोखा उपक्रम !!

जागतिक महिला दिनानिमित्त माता भगीनिंना साडी व खाऊचे वाटप भटके विमुक्त सामाजिक संस्थेचा अनोखा उपक्रम !!


मुरबाड, प्रतिनिधी : भारतीय समाजव्यवस्थेत महिलांचे स्थान हे सर्वोच्च आहे, हे आजच्या आथुनिक युगानेही मान्य केले आहे, म्हणून जगात महिला सबलीकरणावर भर देण्यात येतो. सामाजिक बांधीलकी जोपासत भटके विमुक्त सामाजिक संस्था विविध उपक्रम राबवून निराधार व गरजू लोकांना मदतीचा हात देत असते, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुरबाड तालुक्यातील बिलवडी शेळशद येथे विटभट्टीवर काम करणाऱ्या माता भगिनींना साडी व खाऊचे वाटप करण्यात आले. 


मला घडविण्यात माझ्या आईचा तसेच परीवारातील इतर नातलग महिलांचा खुप मोठा सहयोग होता असे अ‌धोरेखीत करत आज मला खुप समाधान वाटतं जेव्हा मी माझ्या सहकाऱ्यांच्या माध्ममातून संस्थेच्या वतिने निराधार व गरजू माता भगिनींसाठी काही मदत करतो असे याप्रसंगी बोलतांना भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी सांगीतले. 


समाजाचे ऋण फेडण्याची दानत असली की सामाजिक उपक्रमात लोकं सहभागी होतात, भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या सामाजिक उपक्रमाला तसेच जागतिक महिला दिनाच्या तमाम माता भगीनींना हार्दिक शुभेच्छा असे विचार बहुजन विचार प्रणेते विजय हनुवते यांनी व्यक्त केले. 

याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष सुनिल धोंडे, संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे, बहुजन विचार प्रणेते विजय हनुवते, प्रमोद बोस्टे, उमेश पेमारे, ग्रामपंचायत सदस्य गोविंद पेमारे तसेच इतर मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...