गावठी कट्टा पिस्तुल विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या जितेंद्र शर्मा यास टिटवाळा पोलिसांनी केली अटक !!
*बल्याणी दळवी वाडा येथे राहत असलेल्या जितू शर्मा या आरोपीस खडवली येथे अटक*
कल्याण,संदीप शेंडगे : तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीत खडवली स्टेशन जवळ गावठी कट्टा पिस्तुल विक्री करण्यासाठी येणाऱ्या आरोपीस टिटवाळा पोलिसांनी सापळा रचून केली अटक केले आहे.
बल्याणी दळवी वाडा आंबेडकर चौक येथे राहत असलेला जितेंद्र शर्मा उर्फ जितू हा गावठी कट्टा विक्री करण्यासाठी खडवली परिसरात जाणार असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी राम भालसिंग यांना आपल्या गुप्तहेरांना कडून पोलिसांना मिळाली होती.
उपविभागीय पोलीस अधिकारी राम भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू वंजारी आणि पोलीस उपनिरीक्षक विजय सुर्वे यांनी खडवली स्टेशन परिसरात सापळा रचून आरोपी जितू शर्मा यास मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली आहे. मूळचा जौनपुर उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेला जितू काही दिवसांपासून बल्याणी येथे वास्तव्यास होता. जितू याच्या संशयित हलचाली असल्यामुळे पोलिसांची जितूवर आपल्या गुप्तहेरांना मार्फत लक्ष ठेवून होते. सोमवारी जितू हा खडवली येथील पडघा रिक्षा स्टँड जवळ गावठी कट्टा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण खडवली परिसरात नाकेबंदी करून पडगा रिक्षा स्टँड जवळ सापळा रचून मोठ्या शिताफीने आरोपीस अटक केली आहे. आरोपीकडून गावठी कट्टा पिस्टल किंमत पंधरा हजार रुपये आणि सॅमसंग कंपनीचा मोबाईल हस्तगत केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय सुर्वे हे करीत आहेत.

No comments:
Post a Comment