Sunday, 13 March 2022

मुंबईतील दहिसर टोलनाक्याजवळ १ कोटी ९५ लाख रुपयांच्या चरससाठा जप्त, आरोपीला १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी !!

मुंबईतील दहिसर टोलनाक्याजवळ १ कोटी ९५ लाख रुपयांच्या चरससाठा  जप्त, आरोपीला १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी !!


भिवंडी, दिं,१३, अरुण पाटील (कोपर) :
               मुंबईतील दहिसर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल १ कोटी ९५ लाख रुपये किंमत असलेल्या ६ किलो ५६० ग्रॅम वजनाच्या चरससह एका आरोपीला अटक केली आहे. विजय चौहान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नाव असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी विरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
           दहिसर पोलिसांना  काल,दिं,१२ रोजी गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली होती की,एक व्यक्ती अमली पदार्थ घेऊन येत आहे. त्यानुसार सापळा रचून त्याला दहिसर टोल नाक्याजवळ पकडण्यात आले आणि पोलिसांनी १ कोटी ९५ लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीची ६ किलो चरस जप्त केली. न्यायालयाने आरोपीला १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.अशी माहिती डीसीपी सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...