कॉम्रेड भालेराव यांच्या २२ व्या स्मृतिदिनी ; १७ मार्च रोजी चोपडा येथे ग्राम पंचायत कर्मचारी शेतमजूर मेळावा !!
चोपडा, बातमीदार : जळगाव जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक माजी आमदार दिवंगत कॉम्रेड भालेराव यांच्या स्मृतिदिनानिमित्त चोपडा येथील महात्मा फुले नगर मध्ये ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा मेळावा १७ मार्च २०२२ सकाळी ११ वा घेण्यात येणार आहे. त्यावेळी पाचोरा येथील सेवानिवृत्त प्राचार्य बी एन पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी हजर राहावे असे आवाहन. अमृत महाजन संतोष खरे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव, किशोर कनडारे, महेंद्र धनगर, शिवशंकर महाजन, सुभाष कोळी, रतीलाल पाटील, रवींद्र पाटील, मच्छिंद्र पाटील, प्रदीप जोशी, अशोक गायकवाड, विश्वास पाटील, रमेश पाटील, अध्यक्ष चोपडा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ यांनी केले आहे. जळगाव कॉम्रेड भालेराव यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची महाराष्ट्रात पहिल्यांदा संघटना स्थापन केली. तसेच शेतमजुर युनियनचे ते १० वर्षे राज्य अध्यक्ष होते त्यांच्या २२ व्या स्मृती दिनी आयोजित ; या मेळाव्यात शिवजागर कार्यक्रम ही होणार आहे. शिवाजी कोण होता? लेखक ॲड. कामरेड गोविंद पानसरे.. हे पुस्तक प्रती उपलब्ध करून देणार आहोत. असे ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे सचिव अमृत महाजन यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे

No comments:
Post a Comment